आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे वायफाय. वायफाय ( WIFI ) इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी वापरलं जातं. घराघरांमध्ये हल्ली वायफाय बघायला मिळतं. एवढंच काय बँक, ऑफिसेस, दुकानं, मोठे मोठे मॉल्स अगदी रेल्वे स्टेशन्सवरही वायफाय असतं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग झालेल्या वायफायचा ( WIFI ) शोध कसा लागला? हे आपण जाणून घेऊ.

वायफायचं कार्य कसं चालतं?

वाय-फाय ( WIFI ) प्रणाली, जी वायरलेस नेटवर्क आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सीसह कार्य करते. वाय-फाय कनेक्शन प्रदान करण्यासाठी, मॉडेम किंवा तत्सम उपकरणाच्या मदतीने सिग्नल प्रसार प्रदान करणे आवश्यक आहे. संगणक, फोन आणि टॅब्लेट यांसारखी उपकरणे सिग्नल प्राप्त करतात आणि त्यांचे डेटामध्ये रूपांतर करतात. इंटरनेट सेवा पुरवठादाराने ऑफर केलेले कनेक्शन मॉडेमद्वारे प्रदान केले जाते. दुसरीकडे, वाय-फाय, प्राप्त करणारी उपकरणे शोधतील अशा फ्रिक्वेन्सीसह कनेक्शन पसरवून वायरलेस नेटवर्कची निर्मिती प्रदान करते. अशा प्रकारे, वाय-फाय उपकरणे असलेल्या उपकरणांमध्ये सिग्नल एक्सचेंज होते. Wi-Fi द्वारे इंटरनेटशी कनेक्ट करताना सुरक्षा प्रदान करण्यासाठी एन्क्रिप्शन पद्धत वापरली जाते. हे सुरक्षा प्रोटोकॉल आहेत जे एन्क्रिप्शन पद्धतीने हस्तांतरण करण्यास सक्षम करतात. आज सर्वात पसंतीचा आणि सुरक्षित एन्क्रिप्शन प्रकार म्हणजे WPA2 हा होय.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

हे पण वाचा- Jio AirFiber: जिओ एअरफायबरवर मिळतेय १००० रुपयांची सूट; केबलशिवाय हाय स्पीड डेटा मिळेल; कोणासाठी असणार ही ऑफर? जाणून घ्या

पोर्टेबल वाय-फाय म्हणजे काय?

पोर्टेबल वायफाय ( WIFI ) ही इंटरनेट सेवेसह ऑपरेटरद्वारे प्रदान केलेली सेवा आहे, तुम्हाला कोणत्याही वातावरणात इंटरनेटशी कनेक्ट करण्याची संधी मिळू शकते. पोर्टेबल वाय-फायमुळे तुम्ही सर्व खुल्या किंवा बंद ठिकाणी इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकता जे तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट कराल त्या डिव्हाइसमध्ये प्लग इन करून ऑपरेट करू शकता. पोर्टेबल वाय-फाय हे मोबाईल कामगार आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आदर्श ठरतं, किंवा ज्यांची नोकरी फिरतीची आहे आणि इंटरनेट वापरावं लागतं त्यांनाही या वायफायची मदत होते.

वायफायचा शोध कसा लागला?

१९९० च्या दशकात लोकांना इंटरनेटसाठी त्यांच्या उपकरणांना वायर जोडण्याची गरज होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियातील सिरो म्हणजेच CSIRO कॉमनवेल्थ सायंटिफिक रिसर्च अँड ऑर्गनायझेशन मध्ये एक टीम काम करत होती. या टीमचं नेतृत्व डॉ. जॉन ओ सुलिवन करत होते. सुलिवन आणि त्यांची टीम रेडिओ लहरींचा अभ्यास करत असताना एक महत्त्वाचा शोध लावला. हा शोध असा होता की ब्रह्मांडातील रेडिओ लहरींचा अभ्यास करण्यासाठी एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला. या दरम्यान त्यांनी एक अल्गोरिदम विकसित केला हा अल्गोरिदम वीक सिग्नल शोधू शकत होता. हाच अल्गोरिदम पुढे वायफायच्या तंत्रज्ञानात वापरला गेला. वायरलेस डेटा ट्रान्समिशनसाठी हा अल्गोरिदम वापरला. त्यांनी एक चीप तयार केली जी डेटा वायरलेस पद्धतीने ट्र्रान्समिट करु शकत होती. ही चीप इतर उपकरणांमध्ये वापरली जाऊ लागली आणि इंटरनेट वायरशिवाय कनेक्ट होणं शक्य झालं. १९९७ मध्ये इन्स्टिट्युड ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स पहिलं वायफाय स्टँडर्ड अर्थात 802.11 हे जारी केलं. यामुळे वायफाय लोकप्रिय झालं.