राजधानी मुंबईची ओळख समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या जुन्या डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाल्या. त्यावेळी मुंबईकर भावूक झाले होते. मात्र, तुम्हाला माहितीये का ? ११६ वर्षांपूर्वी मुंबईत पर्यावरणस्नेही बस सेवाही अस्तित्वात होती. चला या बेस्ट बसचा इतिहास जाणून घेऊ.
मुंबई लोकल रेल्वेप्रमाणेच बेस्ट उपक्रमाची बस सेवा हीदेखील मुंबईकरांची जीवनवाहिनीच. कदाचित काकणभर अधिक महत्त्व या बस सेवेला आहे. कारण- ती मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते. ५०-६० वर्षे नव्हे, तर तब्बल १५० वर्षे ही सेवा अविरत सुरू आहे. या सेवेनेही अनेक बदल पाहिले. मुंबईकरांच्या प्रवासाच्या बदललेल्या गरजा पाहिल्या आणि त्यानुसार स्वतःच्या सेवेतही अनेक बदल केले. अनेकदा नेहमीच्याच असलेल्या गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहत नाही. पण, हा हा म्हणता या बस सेवेने आता तब्बल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवात प्रवेश केला आहे. अशा प्रकारची ही देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातीलही अनोखी सेवा आहे.
११६ वर्षांपूर्वी मुंबईत अस्तित्वात आली होती पर्यावरणस्नेही बससेवा
एखादा नवीन प्रकल्प आला की, त्याला विरोध होणे हा आपला नित्याचाच अनुभव आहे. असाच अनुभव या बेस्टलाही आला. तब्बल १५० वर्षांपूर्वी जेव्हा ट्राम सेवा सुरू झाली, त्याही वेळेस त्या ट्राम सेवेला याच मुंबईत विरोध झाला होता. हा विरोध कशासाठी झाला आणि या ट्राम सेवेने नंतर कोणती स्थित्यंतरे घडवून आणली. मुंबईच्या प्रगतीत तिचे योगदान काय हे सारे जाणून घेऊ.
ट्रान्स बंद का झाली?
९ मे १८७४ रोजी प्रत्यक्षात घोड्याने ओढणाऱ्या या ट्रान्स धावू लागल्या. ही ट्रान्स सेवा ग्रॅण्ड बिल्डिंग कुलाबा ते पायधुनी नाका, अशी सुरू झाली. त्या सेवेतला हा एक महत्त्वाचा मार्ग होता आणि आणखी एक मार्ग म्हणजे क्रॉफर्ड मार्केट हा होता. या ट्रान्समध्ये दोनच प्रकार होते ते म्हणजे एका घोड्याने ओढणारी आणि दोन घोड्यांनी ओढणारी. दोन घोड्यांनी ओढणाऱ्या ट्रान्सची क्षमता ४० प्रवाशांची होती आणि एका घोड्याने ओढणाऱ्या ट्रान्सची क्षमता २५ च्या आसपास होती. ????मात्र, याचे भाडे बाकी वाहनांच्या तुलनेत कमी होते.??? त्यामुळे या सेवेला बराच विरोध केला गेला आणि अखेर ती काही दिवसांतच बंद झाली. त्यानंतर पुढे इलेक्ट्रिक ट्राम सुरू झाली. ही पहिली इलेक्ट्रिक ट्राम १९०७ साली सुरू झाली. त्या पहिल्याच ट्राम सेवेने मुंबईकरांची मने जिंकून घेतली. मात्र, पुढे जशी रहदारी वाढू लागली तशी ही ट्राम अडचणीची ठरू लागली आणि एक दिवस असा उजाडला की, ३१ मार्च १९६४ साली या ट्रामचा प्रवास संपला. आजही काही मुंबईकर असे आहेत की, ज्यांनी या ट्रामने प्रवास केल्याचा अनुभव घेतला आहे.
हेही वाचा >> गड-किल्ले भ्रमंती; तुम्हाला माहितीये का दरवाजा नसलेला एकमेव किल्ला कोणता? जाणून घ्या रंजक इतिहास
अशी अतिशय रंजक आणि क्वचितच कुणाला माहीत असलेली माहिती लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेद्वारे आपल्याला मिळते.