How did gulab jamun got its name: जगातील अनेक लोक खाद्यपदार्थांचे शौकीन आहेत. आपल्या भारतात सण आले की, त्यात गोडधोड, एकापेक्षा एक भारी मेजवानी असते. त्यातीलच एक सर्वांचा आवडचा खाद्यपदार्थ म्हणजे गुलाब जामुन. गुलाब जामुन हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. स्वीट म्हटलं की आधी सगळे गुलाबजामचं नाव घेतात. लग्न, पार्टी किंवा सणवार असो, थाळीमध्ये स्वीट डिश म्हणून गुलाबजाम असतेच. काहींना जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी काही लोकं गुलाबजाम खाण्यास पसंती दर्शवतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केलात का? त्याला गुलाब जामुन असे का म्हणतात? त्यात गुलाब नाही, जामुनचाही पत्ता नाही, मग गुलाब जामुन हे नाव कुठून आलं? चला तर जाणून घेऊया यामागची रंजक कहाणी…

वास्तविक, गुलाब जामुन या गोडाचे नाव पर्शियाशी संबंधित आहे. हे गोड पर्शियाहून आलं आहे, असे म्हटले जाते. पर्शियामध्ये, गुलाब जामुन सारखे आणखी एक गोड बनवले जाते, ज्याचे नाव लोकमत अल-कादी आहे. या गोड गुलाब जामुनचे नाव देण्याचे नेमके कारण इतिहासात नोंदवले गेले आहे.

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nikki tamboli trolled over bold video
बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती

(हे ही वाचा: भारतात चंद्राला ‘चंदा मामा’ का म्हणतात? काका, भाऊ, बाबा असं का म्हणत नाही, माहितेय? जाणून घ्या रहस्य )

गुलाब जामुन हे नाव कसे पडले?

पर्शियन शब्दसंग्रहानुसार, गुलाब हा शब्द ‘गुल’ आणि ‘आब’ या दोन शब्दांपासून बनला आहे. गुल म्हणजे फूल आणि आब म्हणजे पाणी. याचा अर्थ सुगंध असलेले गोड पाणी. गुलाब जामुन बनवण्यासाठी साखरेचा पाक तयार केला तरी त्याचा वास गोड असतो. त्यामुळे त्याला गुलाब म्हणतात. दुसरीकडे, दुधासह तयार केलेल्या खव्यापासून गोळ्या तयार केल्या जातात. गोळ्यांना गडद रंग देण्यासाठी ते तळलेले आहेत. ज्याची तुलना जामुनशी करण्यात आली आहे. त्यामुळे या गोडाला गुलाब जामुन हे नाव पडले.

असं सांगितलं जातं की, गुलाब जामुन प्रथम इराणमध्ये मध्ययुगात बनवले गेले. नंतर टर्कीच्या लोकांनी ते भारतात आणले. आणखी असं सांगितलं जात की, एकदा मुघल सम्राट शाहजहानच्या स्वयंपाक्याने चुकून तयार केले होते. पण, त्यावेळी त्याची चव लोकांना फार आवडली होती. त्यानंतर हळूहळू ते भारतातील प्रत्येक राज्यात प्रसिद्ध झाले आणि नंतर मिठाईचा एक महत्त्वाचा भाग झालंय.

गुलाब जामुनला इंग्रजीत काय म्हणतात?

गुलाब जामुन भारतात खूप प्रसिद्ध आहे. गुलाब जामुनला इंग्रजीत मिल्क बॉल्स (Milk Balls) म्हणतात, अशी माहिती एका संदर्भातून समोर आलीये.