Do You Know About Fine For Blocking Ambulance: वाहतुकीच्या नियमांचे आपल्यातील बरेच जण मुद्दाम उल्लंघन करतात. त्यामध्ये विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, गाडी चालवताना फोनवर बोलणे आदींचा समावेश असतो. मग स्वाभाविकत: वाहतूक पोलिस अशा बेफिकीर वाहनचालकांकडून दंड वसूल करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अडवल्यास किती रुपयांचा दंड भरावा लागतो?

तर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट करून देणे सर्वांचीच जबाबदारी आहे. रुग्णवाहिका जात असताना वाट न देणाऱ्या वाहनचालकाला १० हजारांचा दंड भरावा लागत. १ डिसेंबर २०२३ पासून रुग्णवाहिकेला रस्ता देण्यास नकार देणाऱ्या किंवा वाट न देणाऱ्या वाहनचालकांवर १० हजारांचा दंड आकारला जाईल, असा इशारा शहरातील वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

रुग्णवाहिका बराच काळ ट्रॅफिकमध्ये किंवा इतर गाड्यांमुळे अडकून राहिल्याने रुग्णांना आपत्कालीन उपचार देण्यात विलंब होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी अशा बेफिकीर वाहनचालकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १९६५ नुसार रुग्णवाहिकेचा मार्ग अडवणाऱ्या कोणत्याही वाहनावर पोलिसांना १०,००० रुपये दंड आकारण्याची परवानगी आहे. पण, आतापर्यंत शहरात हा नियम फारसा अमलात आणला गेलेला नाही.

प्रत्येक मिनीट महत्त्वाचे असते

२०१९ मध्ये या गुन्ह्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या चालानची रक्कम १०० रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढली. डीसीपी (वाहतूक) वीरेंद्र विज म्हणाले की, मागून रुग्णवाहिका येताना दिसली की, वाहनाने रस्त्याच्या अगदी डाव्या बाजूला जावे. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र यादव म्हणाले की, रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे आवश्यक आहे. कारण- आपत्कालीन उपचार देण्यात येत असलेल्या किंवा तशा उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णासाठी प्रत्येक मिनीट महत्त्वाचे असते. एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला असेल आणि त्याला आपत्कालीन उपचारांच्या आवश्यकतेमुळे रुग्णवाहिकेतून नेले जात असेल, तर अशा रुग्णाला काही मिनिटांचाही विलंब जीवघेणा ठरू शकतो.

रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पीसीआर व्हॅन व बचाव कार (rescue cars) ही आपत्कालीन वाहने आहेत, ज्यात सायरन व टॉर्चची सुविधा असते. त्यांना सिग्नलवर थांबण्याची आवश्यकता नसते. रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन वाहनांना मोफत प्रवास करण्याची परवानगी देणारा कायदा आहे. पण, या गाड्या रस्त्यावरून जात असताना इतर वाहनांनी रस्त्याच्या डावीकडे जावे आणि त्यांचा मार्ग अडवू नये, असे वकील मनीष शांडिल्य यांनी सांगितले आहे.

या सगळ्या गोष्टींवर रुग्णवाहिका चालक सतीश यादव यांनीसुद्धा मत मांडले आहे की, बहुतेक चालकांमध्ये अजिबात शिस्त नसते. हॉर्न वाजविल्याशिवाय रुग्णवाहिकेला अनेक जण रस्ता देत नाहीत. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नलवर रुग्णवाहिका इतर वाहनांप्रमाणेच अडकलेली असते. गुरुग्राममधील सेक्टर ४० येथील रहिवासी सौरभ शर्मा यांनीही या संदर्भात सहमती दर्शवली. अनेक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी खूप धडपडताना दिसतात. जेव्हा त्यांना रस्ता मिळतो तेव्हा बरेच ड्रायव्हर त्यांच्यामागे जातात; जेणेकरून त्यांनाही वाहतूक कोंडीशिवाय अन् मोफत रस्ता मिळेल.