Electricity Bill: केंद्र सरकारने नुकतेच वीज (ग्राहकांचे हक्क) नियम, २०२० मध्ये सुधारणा करून नवीन दर लागू केले गेले आहेत. त्यातील दोन प्रमुख बदलांमध्ये दिवसाची वेळ (टीओडी) आणि स्मार्ट मीटर तरतुदी यांचा समावेश आहे. २३ जून रोजी २०२० च्या नियमांमध्ये सुधारणा करून, बदल सादर करण्यात आले. त्या बदलांनुसार महिन्याचे वीज बिल तुमच्या वापराच्या आधारे निश्चित केले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे यामुळे तुम्हाला तुमच्या वीज बिलाची गणना कशा प्रकारे केली जाते याची माहिती मिळेल. जेणेकरून तुम्ही वीज कमी प्रमाणात वापराल आणि त्यामुळे तुमचे वीज बिलदेखील नियंत्रणात राहील. दिल्ली, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या मेट्रो सिटीसह मुंबईमध्ये कशा प्रकारे मीटरची गणना केली जाते ते आपण पाहू.
मुंबईतील सर्व सुधारित दर
टप्पे | बीईएसटी (BEST) | टाटा पॉवर | अदानी इलेक्ट्रिसिटी | एमएसईडीसीएल (MSEDCL) |
0-100 युनिट्स | 3.69 | 4.73 | 5.66 | 5.58 |
101-300 युनिट्स | 7.04 | 7.33 | 7.76 | 10.81 |
301-500 युनिट्स | 10.63 | 10.98 | 9.66 | 14.78 |
500+ युनिट्स | 12.60 | 11.63 | 10.76 | 16.74 |
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग (BEST), टाटा पॉवर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) व अदानी पॉवर यांसारख्या वीज वितरण कंपन्यांना १ एप्रिलपासून लागू झालेल्या वीज दरांत वाढ करण्याची परवानगी दिली आहे.
हेही वाचा : पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
मुंबईमध्ये वीज बिलाची गणना निश्चित शुल्क (प्रतिमाह), ऊर्जा शुल्क, व्हीलिंग शुल्क (प्रतियुनिट), इंधन समायोजन शुल्क व विद्युत शुल्क जोडून केली जाते.