How To Scan Documents On Google Drive : महत्त्वाची कागदपत्रे कोणालाही पाठविताना ती स्कॅन करून पाठवावी लागतात. त्यामुळे आपण सगळेच फोनवर इतर थर्ड पार्टी अ‍ॅप्स इन्स्टॉल करू लागलो आहोत. पण, खरं तर तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप घेण्याची गरज नाही. गूगल ड्राइव्हने आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी बिल्ट-इन डॉक्युमेंट स्कॅनर (Google Drive’s Document scanner) फीचर सादर केले आहे. जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करायचे असेल, तर तुम्हाला दुसरा कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही.
डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी गूगल ड्राईव्हची घ्या मदत (Scan Documents On Google Drive)
१. गूगल ड्राईव्ह ॲप अपडेट करा (Update your Google Drive app)
सगळ्यात आधी तुमच्या आयफोन किंवा आयपॅडवर गूगल ड्राइव्ह अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन आहे ना याची खात्री करा. बिल्ट-इन डॉक्युमेंट स्कॅनर व्हर्जन 4.2023.46227 मध्ये समाविष्ट आहे.
२. नवीन कॅमेरा FAB शोधा (Locate the new camera FAB)

अपडेट केलेले गूगल ड्राइव्ह अ‍ॅप उघडल्यावर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात प्लस (+) बटणाच्या वर एक नवीन कॅमेरा फ्लोटिंग अ‍ॅक्शन बटण (FAB) दिसेल. डॉक्युमेंट स्कॅनर सुरू करण्यासाठी त्यावर टॅप करा.

३. कागदपत्रे कॅप्चर करा (Capture documents)

कॅमेरा इंटरफेस, जो व्ह्युफाइंडर म्हणून काम करतो, तो तुमच्या समोरील कागदपत्रे ऑटोमॅटिक स्कॅन करतो. मॅन्युअल नियंत्रणासाठी तळाशी असलेले कॅमेरा शटर बटण वापरा. व्ह्युफाइंडर तुम्हाला स्कॅनसाठी कॅमेरा अचूकपणे ठेवण्यास मदत करण्यासाठी काही सल्ले देईल. तसेच बहु-पृष्ठ (मल्टी पेज) दस्तऐवजांसाठी एकामागून एक स्कॅन करण्यास सपोर्ट करतो.

४. एडिटिंग पर्याय एक्सप्लोर करा (Explore editing options)

हे फीचर एकदा तुम्ही कागदपत्र कॅप्चर केल्यानंतर, गूगल ड्राइव्हसारखे विविध एडिटिंग पर्याय तुमच्यासमोर ठेवते. तुमचे स्कॅनर सुधारण्यासाठी रंग, ग्रेस्केल, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट किंवा फोटो टू ईन्हान्स, फोटो क्रॉप करा व रोटेट करा, असे पर्यायसुद्धा तुम्हाला देते. त्यानंतर तुमच्या गरजेनुसार बदल करा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.

५. सेव्ह करा आणि व्यवस्थित करा (Save and organise)

कॅप्चर केलेले डॉक्युमेंट थेट तुमच्या गूगल ड्राइव्हमध्ये स्टोअर करण्यासाठी सेव्ह बटण दाबा. त्यामुळे तुमच्या डिजिटाइज्ड डॉक्युमेंट्समध्ये सहज अ‍ॅक्सेस होऊ शकेल.

सर्व गूगल अकाउंट्ससाठी उपलब्ध

तुमचे वर्कस्पेस अकाउंट असो किंवा वैयक्तिक, बिल्ट-इन डॉक्युमेंट स्कॅनर सर्व प्रकारच्या गूगल अकाउंट्ससाठी उपलब्ध आहे. तेव्हा आजच एखादे डॉक्युमेंट नक्की स्कॅन करून बघा…