जगात चौथ्या क्रमांकावर भारतीय रेल्वेचं जाळं आहे. लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करतात. रेल्वेचं तिकीट न काढता लांबचा प्रवास करणारे फुकटे प्रवाशीही तुम्ही पाहिले असतीलच, नाही का? मात्र, तिकीट काढूनही प्रवास न करणारे प्रवाशी तुम्ही पाहिलेत का? अहो, भारतातील ‘या’ स्थानकावर लोकं चक्क रेल्वेचे तिकीट काढतात, मात्र प्रवास करत नाहीत. काय आहे ही भानगड? तुम्हाला जाणून घ्यायची आहे का ‘ही’ अजब गोष्ट? मग वाचा ही बातमी सविस्तर….
‘या’ रेल्वेचा इतिहास समजून घ्या
भारतीय रेल्वेचा इतिहास फार विशाल आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या दोन नेत्यांचे मोठे योगदान आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक अनोखे रेल्वे स्टेशन आहे. त्या स्टेशनचे नाव ‘दयालपूर’ रेल्वे स्टेशन आहे. हे १९५४ मध्ये बांधले गेले. प्रत्येक स्टेशनप्रमाणे तिथेही ट्रेन थांबायची. काळ बदलला आणि जवळपास ५० वर्षांनंतर रेल्वेने त्या स्थानकाला टाळे ठोकले. हे २००६ पासून बंद आहे. त्याचं कारण पुढील प्रमाणे आहे….
(हे ही वाचा : भारतातल्या कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, माहितीये का? लाखो लोकांसाठी प्रवासाचा एकमेव पर्याय )
रेल्वेचा नियम काय होता?
रेल्वेच्या नियमांनुसार, एखाद्या स्थानकावर मानकापेक्षा कमी तिकिटे दीर्घकाळापर्यंत विकली गेल्यास ते स्थानक ठराविक वेळेनंतर बंद केले जाते. ते स्थानक २००६ मध्ये याच कारणासाठी बंद करण्यात आले होते. आता हे स्थानक पुन्हा बंद होऊ नये, म्हणून त्या स्थानकाजवळील ग्रामस्थ रोज तिकीट खरेदी करून प्रवास करत नाहीत. त्यांच्या या प्रयत्नांची आज खूप चर्चा आहे. त्यामुळेच हे स्थानक आज सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे ट्रेन तिथेच थांबते.
अखेर स्थानिक जनतेने ठरवलं…
रेल्वेची किमया बघता, गावातील जनतेने स्थानिक प्रशासन, आमदार, खासदार यांची मदत घेऊन ही रेल्वे सेवा निरंतर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले. ही रेल्वे सेवा बाधित न होऊ देण्याचा संकल्प केला. लोकांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने २०२२ मध्ये हे स्थानक पुन्हा सुरू केले. मात्र, हे स्थानक केवळ थांबा म्हणून सुरू करण्यात आले असून येथे केवळ १-२ गाड्या थांबतात. यानंतर हे स्थानक बंद पडू देणार नाही, असा पवित्रा स्थानिक लोकांनी घेतला. त्यामुळेच इथले लोक आपापसात देणगी जमा करून दररोज किमान तिकीट विक्रीचे लक्ष्य पूर्ण करतात.