How To Pin Recent Contact On Paytm : आपण अनेकदा यूपीआय ॲप्स वापरून नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, विक्रेते आदींना नियमितपणे पेमेंट करीत असतो. पेमेंट करण्यासाठी सहसा आपल्याला संपर्क यादीतून संपर्क शोधावा लागतो किंवा स्कॅन करून पेमेंट करण्यासाठी आपल्याला क्यूआर कोड मागवावा लागतो आणि मग नंतर पेमेंट करावे लागते. तर, तुमचे काम आणखीन सोपे करण्यासाठी पेटीएमने त्यांच्या अॅपवर २०२३ मध्येच एक नवीन फीचर आणले होते. या फीचरचे नाव ‘पिन रिसेंट पेमेंट्स’ (pin recent payments) असे आहे. हे युजर्सना त्यांच्या पेटीएम अॅपवरील काही निवडक संपर्क पिन करण्यास आणि पेमेंट लवकर करण्यासाठी करण्यास परवानगी देत आहेत.
जर तुम्हालाही पेमेंट करताना संपर्क शोधण्यात अडचणी येत असतील, तर तुम्ही पेटीएम ॲपवर असे संपर्क पिन करू शकता आणि सहजपणे पेमेंट करू शकता. पण, त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे की, हे पेटीएम फीचर आहे. इतर UPI ॲप्सवर लागू होत नाही. तसेच युजर्सकडे सध्या फक्त पाच संपर्क पिन करण्याचा पर्याय आहे. त्याशिवाय हे फीचर फक्त स्कॅन अँड पे पर्यायांतर्गत ॲप्सच्या अलीकडील संपर्कांसाठीच काम करते. याचा अर्थ, तुम्ही फक्त ते संपर्क पिन करू शकता, ज्यांना तुम्ही अलीकडेच पेमेंट केले आहे.
सगळ्यात पहिल्यांदा
पेटीएम अॅपचे नवीन व्हर्जन घ्या.
यूपीआय खाते अॅक्टिव्ह करा.
पेटीएमवर पेटीएम यूपीआय आणि वॉलेट सक्रिय असणे आवश्यक आहे.
लवकर पेमेंट होण्यासाठी पेटीएमवर संपर्क पिन करण्याच्या सोप्या टिप्स पुढीलप्रमाणे…
तुमच्या स्मार्टफोनवर अपडेट केलेले पेटीएम अॅप उघडा.
आता यूपीआय मनी ट्रान्स्फर विभागाअंतर्गत स्कॅन अँड पे पर्यायावर टॅप करा.
अलीकडील विभाग विस्तृत करण्यासाठी स्लाइडवर करा.
पिन बटण दिसण्यासाठी संपर्कावर (पेमेंट) जास्त वेळ दाबून ठेवा.
वरच्या बाजूला संपर्क पिन करण्यासाठी त्यावर टॅप करा. अशा प्रकारे तुमचे ५ संपर्क पिन होतील.