Diamonds Rain: आकाशातून होणारा पावसाचा, बर्फाचा वर्षावा हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर नजाऱ्यांपैकी एक मानला जातो. पण तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, आपल्याच ब्रह्मांडात असं एक ठिकाण आहे जिथे पाणी, बर्फ नव्हे तर चक्क हिऱ्यांचा वर्षाव होतो. बसला ना धक्का! पण हे खरंय. आपल्या सौरमंडळात नवग्रह आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे असे मंगळ, शनी, बुध, गुरु, शुक्र हेच ग्रह आपण सारे जाणतो. पण याशिवाय बाकीही ग्रहांवर काही ना काही अद्भुत गोष्टी घडत असतात. यातीलच एक म्हणजे हिऱ्यांचा पाऊस.
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार नेपच्यून व युरेनस हे ग्रह पृथ्वीच्या आकाराहुन अनुक्रमाने १५ व १७ पट मोठे आहेत. या ग्रहांच्या गर्भात हवेचा दबाव अधिक आहे.तसेच या ग्रहांवर मिथेन गॅसचे प्रमाण अधिक असते. मीथेन गॅस हा हायड्रोजन व कार्बनच्या अणूंसह बनलेला असतो. ज्याचे रासायनिक सूट आहे CH४. ज्याप्रकारे पृथ्वीवर उपलब्ध पाणी हे हवेच्या दाबाने वाफेच्या रूपात आकाशात जाते व मग पाऊस पडतो.
नेपच्यून व युरेनसवर मीथेनवर हवेचा दबाव पडताच हायड्रोजन व कार्बन बॉण्ड तुटून त्यांचे हिऱ्यासारख्या खड्यांमध्ये रूपांतरण होते. या दोन्ही ग्रहांचे अंतर पृथ्वीपासून खूप असून इथे तापमान सुद्धा २०० डिग्री सेल्सियसहुन कमी असते.
हे ही वाचा<< घर किंवा कारसाठी कर्ज घेतले पण परतफेडीआधी मृत्यू झाला तर? काळजी नको! बँकेचे नियम जाणून घ्या
काही अभ्यासकांच्या माहितीनुसार नेपच्यून व युरेनस ग्रहांवर मिथेन गॅसमुळे बर्फ तयार होतो व जेव्हा सुपरसॉनिक हवा वाढते तेव्हा त्याच बर्फाचे ढग तयात होतात. सुपारसॉनिक हवेचा वेग हा १५०० मैल/प्रति तास इतका असतो. दरम्यान या दोन्ही ग्रहांवरील तापमान, पृथ्वीपासूनचे अंतर व वातावरण पाहता पुढील ५० वर्षात तरी इथवर पोहोचणे माणसासाठी शक्य होईल असे वाटत नाही.