चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी जितके चाहत्यांना कौतुक असते, तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्सुकतादेखील असते. पडद्यावर दिसणारे हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे राहतात, वागतात, त्यांची जीवनशैली काय असते. याबरोबरच, त्यांच्या नात्यांबद्दल, आयुष्यात काय चालले आहे, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असते. चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या अनेक कलाकारांनी त्यांच्या नावामध्ये बदल केला आहे. त्यांचे खरे नाव काय, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी,बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकरांच्या खऱ्या नावांबद्दल जाणून घेऊयात.

बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?

‘मुगल ए आजम’, ‘दुनिया’, ‘राम और श्याम’, ‘सौदागर’, ‘विधाता’, ‘गंगा जमुना’, ‘देवदास’, ‘आदमी, ‘कर्मा’, अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांचे खरे नाव युसुफ खान असे होते. मीना कुमारी यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचे खरे नाव महजबीन बानो असे होते.

who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
prithvik pratap and prajakta lovestory
प्रसाद खांडेकरच्या नाटकामुळे झालेली पहिली भेट अन्…; ‘अशी’ जमली पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची जोडी! खूपच हटके आहे लव्हस्टोरी
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
Lakshmi Pujan in traditional fervor fireworks at the business premises
लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी
raj kapoor prepare dimple kapadia look in bobby
‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”

नर्गिस यांचे खरे नाव फातिमा राशिद असे आहे. आपल्या चित्रपटांसह सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान असे होते.थलाइवा म्हणून प्रसिद्ध असणारे, सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव शिवाजीराव गायकवाड असे होते. दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांचे नाव हरिलाल जरीवाला असे होते. तर राजेश खन्ना यांनी जतीन हे स्वत:चे नाव बदलले होते.

‘डिस्को डान्सर’, ‘फूल और अंगार’, ‘डान्स डान्स’, ‘मर्द’, ‘शेरा’, ‘ओह माय गॉड’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मिथून चक्रवर्ती यांचे नाव आधी गौरांग असे होते.

सैफ अली खानचे खरे नाव साजीद अली खान असे आहे. कियार अडवाणीचे खरे नाव आलिया अडवाणी असे होते. तिने सलमान खानने दिलेल्या सल्ल्यानुसार तिचे नाव बदलल्याचे म्हटले आहे.आयुषमान खुरानाचा जन्म झाला होता, त्यावेळी त्याचा नाव निशांत खुराना असे होते. शिल्पा शेट्टीचे खरे नाव हे अश्विनी शेट्टी असे होते. मात्र तिच्या आईने सुनंदा शेट्टी यांनी तिचे नाव बदलून शिल्पा असे ठेवले. अक्षय कुमारचे नाव राजीव हरि ओम भाटिया असे ठेवले होते. अजय देवगणचे नाव आधी विशाल देवगण असे होते.

हेही वाचा: “मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”

दरम्यान, अनेकविध कारणांमुळे या कलाकारांची खरी नावे समोर आली आहेत. हे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असतात.