Animals have Exceptional Memory : स्मरणशक्ती हे एक बुद्धीसामर्थ्य आहे. स्मरणशक्ती जर उत्तम असेल तर व्यक्तीला अनेक ठिकाणी याचा फायदा दिसून येतो. पण, तुम्हाला माहितीये का काही प्राण्यांनासुद्धा विलक्षण स्मरणशक्ती असते. आज आपण काही अशा प्राण्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. (Do you know some animals have exceptional memory they can challenge human beings)
चिंपांझी
चिंपांझीला चेहरे आणि घटना आठवतात. ते अनेक वर्षांपूर्वीचे साठवून ठेवलेले अन्नपदार्थांचे ठिकाण आणि व्यक्तीसुद्धा ओळखतात.
डॉल्फिन
डॉल्फिन २० वर्षांहून अधिक काळ काही शिट्ट्यांचा आवाज लक्षात ठेवू शकतो. ही स्मरणशक्ती क्लिष्ट सामाजिक संरचना आणि त्यांच्या परिसरात एकमेकांना सहकार्य करण्यास मदत करते.
हत्ती
जलस्रोतांची ठिकाणे लक्षात ठेवण्यात आणि अनेक दशकांनंतरही एखादी व्यक्ती ओळखण्यात हत्ती सक्षम असतो. हत्तीची दीर्घकालीन स्मृती त्याला जंगलात टिकून राहण्यास मदत करते.
घोडे
घोडे मानवी चेहरे आणि आवाज लक्षात ठेवतात, अनेक वर्षांनंतरही ते त्यांच्या मालकाला ओळखतात. त्यांची स्मृती प्रशिक्षणातसुद्धा मदत करते, यामुळेच त्यांना विश्वसनीय सहकारी आणि कामगार म्हणून ओळखले जाते.
श्वान
श्वानांमध्ये दीर्घकाळ टिकणारी स्मृती असते. ते आज्ञा, युक्त्या आणि त्यांच्या मालकांपासून दूर झाल्यानंतरसुद्धा लक्षात ठेवतात. त्यांच्यामध्ये सुगंध आणि आवाज आठवण्याची क्षमता असते.
सी लॉयन
सी लॉयन प्रशिक्षण दिलेल्या गोष्टी आणि आज्ञा वर्षानुवर्षे अभ्यासाशिवाय लक्षात ठेवू शकतात. त्याची दीर्घकालीन स्मृती समुद्रात टिकून राहण्यास फायदेशीर ठरते.
खार
खारीमध्ये प्रभावी स्मृतीशक्ती असते. साठवून ठेवलेली काजूची ठिकाणे त्यांच्या लक्षात राहतात. तीव्र हिवाळ्यात त्यांना अन्न शोधण्यास चांगली स्मरणशक्ती फायद्याची ठरते.