Sweet City of India: भारताच्या विविधतेची उदाहरणं प्रत्येक शहरांमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागाचा समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा, भाषा यांचा समावेश आहे. असेच बिहार राज्यात वसलेले मुझफ्फरपूर हे अशाच विविधतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ‘भारताचे गोड शहर’, अशी बिरुदावली लाभलेल्या मुझफ्फरपूरला एका विशिष्ट फळाच्या – लिचीच्या लागवडीमुळे हे नाव मिळालं आहे. लिची हे एक स्वादिष्ट आणि रसाळ फळ असून, त्याचे अनेक प्रकार आहेत. बिहारमध्ये लिचीचे सर्वाधिक उत्पादन होते. शाही लिची, कसबा लिची, लोंगिया लिची, बेदाणा लिची, चायना लिची आणि ईस्टर्न लिची या बिहारमध्ये पिकवल्या जाणाऱ्या लिचीच्या काही प्रमुख जाती आहेत. हे शहर भारताचे ‘गोड शहर’ म्हणून ओळखले जाते.
“भारताचे गोड शहर” मुझफ्फरपूर इतिहास
मुझफ्फरपूर हे शहर गंडक नदीच्या काठावर वसले आहे. १८७५ मध्ये या शहराला जिल्ह्याचा स्वतंत्र दर्जा मिळण्यापूर्वी ते मूलतः तिरहुत जिल्ह्याचा एक भाग होते. मुझफ्फरपूरमध्ये बोलली जाणारी प्राथमिक भाषा बज्जिका ही आहे. शहरात अनेक गावे, प्रशासकीय विभाग, पोलिस ठाणी आणि महसूल मंडळे येतात. मुझफ्फरपूरमध्ये मुझफ्फरपूर थर्मल पॉवर प्लांट आहे, जो या प्रदेशाच्या वीजपुरवठ्यामध्ये प्रमुख योगदान देतो.
मुझफ्फरपूरचा गोड मोनिकर
मुझफ्फरपूरला लिचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असल्यामुळे ‘भारताचे गोड शहर’, असे टोपणनाव या शहराला मिळाले आहे. शहरातील हवामान आणि सुपीक माती यांमुळे लिचीच्या लागवडीसाठी हे शहर एक आदर्श केंद्र ठरले आहे. परिणामी, मुझफ्फरपूर हे भारतातील अग्रगण्य लिची उत्पादकांपैकी एक शहर आहे. शाही लिचीबद्दल बोलायचे, तर हा लिचीचा सर्वोत्तम प्रकार आहे, जो प्रामुख्याने मुझफ्फरपूरमध्ये पिकवला जातो. देशाच्या इतर भागांतही या नावाने त्याची लागवड केली जाते, परंतु मुझफ्फरपूरच्या शाही लिचीची गुणवत्ता उत्कृष्ट आहे, ज्यासाठी त्याला जीआय टॅगदेखील मिळाला आहे.
हेही वाचा >> White City Of India : भारतातील ‘हे’ ठिकाण White City नावाने ओळखतात; पण कारण काय? जाणून घ्या
लिचीचा हंगाम
दरवर्षी लिचीच्या हंगामात, लिचीच्या बागा फुलून गेल्याने मुझफ्फरपूरचे रूपांतर एका चैतन्यमय स्वर्गात होते. हे शहर लिची फळाच्या उत्पादनाचे केंद्र बनले आहे. ही फळे भारताच्या विविध भागांत वितरित केली जातात.
आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व
मुझफ्फरपूरचा लिची उद्योग केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेलाच चालना देत नाही, तर शहराच्या ओळखीलाही एक अनोखे महत्त्व प्राप्त करून देतो. लिचीच्या मूळ चवीमुळे या गोड फळाची अस्सल चव चाखणाऱ्यांसाठी हे ठिकाण आवडीचे बनले आहे.