Police Full Form: पोलीस हा सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत असा कोणी नसेल ज्याने ‘पोलीस’ हा शब्द ऐकला नसेल. पोलिसांचे नाव आणि काम आपल्या सर्वांना माहित आहे, पण तुम्हाला माहित आहे का की “पोलिस” ला देखील एक पूर्ण फॉर्म आहे…?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील प्रत्येक प्रदेशातील गुन्ह्यांचा मुकाबला करताना पोलिसांचे काम किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पोलिस विविध मार्गांनी नागरिकांचे गुन्हेगारांपासून संरक्षण करतात. पोलीस हे एक सुरक्षा दल आहे जे आपल्या देशातील रहिवाशांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते, जसे सैन्य परकीय शत्रूंपासून आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज असते. त्याचप्रमाणे, अंतर्गत अनैतिक कृत्यांपासून सामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि देशाच्या हितासाठी प्रत्येक गुन्हेगारी खटला चालवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे.

(हे ही वाचा : ट्रॅफिक सिग्नलचा शोध कुणी लावला? ‘या’ ठिकाणी बसवण्यात आला जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल )

जमिनीच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचे अधिकार पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशाची कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्याचे काम आहे. दुसरीकडे, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणामुळे त्रास होत असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर तो पोलिसांची मदत घेऊन त्याच्या स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकतो.

‘POLICE’ चे फुल्ल फॉर्म काय आहे?

भारतातील पोलीस खाते ब्रिटिशांनी सुरू केले होते. अनेक लोकांना पोलिसचा फुल फॉर्म माहित नाही, ‘Public Officer for Legal Investigations and Criminal Emergencies” असे पोलिसाचे पूर्ण रुप आहे. फक्त यातून कोलकाता वगळला तर भारतातील सर्व राज्यांतील पोलीस खाकी वर्दी (गणवेश) परिधान करतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know that police also have full form understand the full meaning of police here pdb
Show comments