भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत. परंतु त्यातही पाच शेअर्स इतके महाग आहेत, ते सामान्य लोकांना घेणं परवडण्यासारखं नाही. कारण त्या शेअर्सची किंमत जवळपास १ लाखाच्या घरात आहे. टायर बनवणारी कंपनी एमआरएफचा शेअर बाजारात सर्वात महागडा शेअर आहे. १३ जूनला या शेअर्सनं १ लाखांचा टप्पा ओलांडला होता. एमआरएफच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात जवळपास ४७ टक्के वाढ झाली. MRF चे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. १९४६ मध्ये कंपनीने फुगे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. १९५२ मध्ये कंपनीने टायर व्यवसायात प्रवेश केला. ही कंपनी १९६१ मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली. MRF चे भारतात २५०० पेक्षा जास्त वितरक आहेत आणि कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर कंपनी असताना जगातील ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये टायर्सची निर्यात करते. भारतातील सर्वात महागड्या शेअर्समध्ये पेज इंडस्ट्रीज (४१,००० रुपयांपेक्षा जास्त), हनीवेल (३६,००० रुपयांपेक्षा जास्त) आणि श्री सिमेंट (२४,५०० रुपयांपेक्षा जास्त) यांचा समावेश होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा