पोलिसांकडे कोणती गाडी असते? भारतात कोणाला प्रश्न विचारला तर एक-दोन गाड्यांची नावे मनात येतील. ज्यामध्ये मारुतीची जिप्सी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, आता भारतात पोलिसांच्या गाड्यांमध्ये बरेच बदल झाले आहेत. आता अनेक राज्य सरकारांनी चांगल्या गाड्या दिल्या आहेत. पण एक असं ठिकाण आहे जिकडे लष्करी पोलीस रस्त्यावर आणि शेतात घोड्यावर किंवा वाहनांवर गस्त घालत नाहीत, तर पोलीस चक्क रेड्यावर बसून गस्त घालतात. ब्राझीलमधील उत्तर भागात जिथे अमेझॉन नदी अटलांटिका महासागराला मिळते, तिथे माराजो नावाचे एक बेट आहे. स्वित्झर्लंढच्या आकाराचे हे बेट अतिशय सुंदर व जैवविविधतेने नटलेले आहे. मात्र तिथली एक विचित्र पद्धत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पद्धत म्हणजे पोलिसांची गस्त घालण्याची अनोखी पद्धत. याठिकाणी पोलीस चक्क रेड्यावर बसून गस्त घालतात.

रेड्यावर बसून घालतात गस्त

News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Anganwadi workers murder case in Ahilyanagar Notice of action to Anganwadi workers
‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस
cylinders used by vegetable vendors in dombivli
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील पदपथावर भजी विक्रेत्याकडून सिलिंडरचा वापर
Police sub-inspector arrested for taking bribe to avoid arrest
अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

याठिकाणी लष्करी पोलीस दुचाकी गाडीवरून, चारचाकी गाडीतून किंवा घोड्यावर बसून गस्त घालताना दिसत नाहीत. त्याऐवजी ते चक्क रेड्यांचा वापर करतात! ‘एशियन वॉटर बफेलोज’ या प्रजातीचे हे आशियाई रेडे त्यांना यासाठी सोयीचे वाटतात. हीच प्रजाती भारतात आढळते व आग्नेय आशियातील अनेक देशांमध्येही आढळते. आता कल्पना करा की, आपल्याकडे जे रेडे दिसतात तशाच रेड्यावर बसून हे पोलिस तेथील रस्त्यांवर फिरत आहेत. दरम्यान हे आशियाई रेडे या बेटावर कसे पोहोचले हेसुद्धा एक कोडंच आहे. काहींच्या मते, बेटाच्या किनाऱ्याला एक जहाज धडकले होते व त्यामधील रेडे या बेटावर आले. तर काहींच्या मते फ्रेंच गयानामधील तुरुंगातून पळून आलेल्या कैद्यांनी आपल्यासमवेत हे रेडे आणले.

रेड्यांची संख्या ५ लाखाच्या आसपास

दरम्यान हे आशियाई रेडे आता तिथे चांगलेच रुळले आहेत. तेथील वातावरणात ते मिसळून तिथलेच झाले आहेत! आता त्यांची संख्या आता ५ लाखाच्या आसपास आहे. विशेष म्हणजे बेटावरची मानवी लोकसंख्या ४,४०,००० आहे. याचा अर्थ तिथे सध्या माणसांपेक्षा रेडे, म्हशीच अधिक झाले आहेत! त्यांना आता बेटावरील लोकांच्या संस्कृतीमध्ये आणि आर्थिक क्षेत्रातही महत्त्वाचे स्थान आहे.

हेही वाचा >> भारतातील सर्वात जास्त उंचीवरील रेल्वेस्थानक कुठे आहे माहिती आहे का? जाणून घ्या ठिकाणाचे नाव

बफेलो सोल्जर्स

१९ व्या शतकात अमेरिकन सैनिकांनी या पोलिसांना “बफेलो सोल्जर्स” असे नाव दिले होते. या रेड्यांच्या पाठीवर विशेष खोगीर घालून त्यावर ते पोलीस बसलेले असतात. ज्यावेळी पुरामुळे बेटावरील रस्त्यांवर चिखल होतो, अशावेळी वाहने किंवा घोड्यांच्या तुलनेत रेड्यांची सवारी फायद्याची ठरते. चिखलातून वाट काढणेही रेड्यांना सोपे जाते.