पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लास्टिकच्या बाटल्यांवर तुम्ही आडव्या रेषा पाहिल्या असतील. पण या रेषांचा प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये समावेश का केला जातो, याबाबत खूप कमी जणांना माहिती असते. पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये या आडव्या रेषांचा समावेश करण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. कोणते आहे ते कारण जाणून घ्या.
प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये असणाऱ्या रेषांमागचे वैज्ञानिक कारण
प्लास्टिक बाटल्यांवर असणाऱ्या या रेषांचा समावेश डिझाईनमध्ये बाटलीच्या सुरक्षेसाठी केला जातो. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या बाटल्या बनवताना सॉफ्ट प्लास्टिक वापरले जाते. या सॉफ्ट प्लास्टिकपासून बनलेल्या बाटल्यांवर आडव्या रेषा बनवल्या नाहीत तर काही दिवसानंतर त्या बाटल्या फुटू शकतात. या रेषांमुळे बाटली मजबुत होते. या कारणामुळे प्रत्येक प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये आडव्या रेषा असतात.
आणखी वाचा : व्हॉटसअॅपवरील Video Call रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स
तसेच या रेषांमुळे बाटली पकडणे ही सोपे होते. अनेकवेळा प्रवासादरम्यान पाणी पिण्यासाठी अशा बटल्यांचा वापर केला जातो. तेव्हा अधिक काळासाठी अशी बाटली हातात धरण्यासाठी त्यावर असणाऱ्या रेषांची मदत होते.