Incredible Animals That Can Reproduce Without a Mate : “निसर्ग अद्भुत आहे! तुम्हाला माहीत आहे का की असे काही सजीव प्राणी आहेत, ज्यांना जोडीदाराशिवाय मुले होऊ शकतात? याला अलैंगिक पुनरुत्पादन म्हणतात. याचा अर्थ असा की, एक पालक स्वतः सारख्याच प्रती बनवू शकतो, जसे की क्लोन (clone).

“जोडीदाराशिवाय बाळं जन्माला घालण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. चांगली गोष्ट अशी आहे की, या क्षमतेमुळे जोडीदार शोधण्याची चिंता न करता प्रजातीची संख्या जलद वाढू शकते. वाईट गोष्ट अशी आहे की, ते फक्त काही विशिष्ट ठिकाणीच राहू शकतात आणि त्याच भक्षकांकडून त्यांच्यावर सहज हल्ला केला जातो.”

तुम्हाला वाटेल की, फक्त साध्या जीवाणूंसारखे जीव हे करू शकतात, परंतु प्रत्यक्षात काही महाकाय प्राणीदेखील हे करू शकतात! चला, काही आश्चर्यकारक प्राण्यांवर एक नजर टाकूया, जे स्वत:सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बाळाला जन्म देतात, जन्माला घालतात.”

१. शार्क (Sharks)

तुम्हाला माहीत आहे का की काही मादी शार्क नर शार्कशिवायही बाळांना जन्म देऊ शकतात? याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. हा एक प्रकारचा अलैंगिक पुनरुत्पादन आहे, जिथे बाळ फलित न झालेल्या अंड्यांपासून विकसित होतात. हे अशा शार्कमध्ये दिसून आले आहे, ज्यांना बराच काळ मत्स्यालयात ठेवले जाते आणि तिथे कोणतेही नर मासे नसतात. २००१ मध्ये हॅमरहेड शार्क बंदिवासात असताना पहिल्यांदाच पार्थेनोजेनेसिस घटनेची नोंद झाली होती.”

२. स्टारफिश ( Starfish )

स्टारफिश हे आश्चर्यकारक प्राणी आहेत, जे दोन वेगवेगळ्या प्रकारे बाळांना जन्म देऊ शकतात! ते बहुतेक प्राण्यांप्रमाणे लैंगिकरित्या पुनरुत्पादन (reproduce sexually) करू शकतात, परंतु ते अलैंगिकपणे (reproduce asexually) देखील पुनरुत्पादन करू शकतात.

काही स्टारफिश त्यांचे शरीर दोन भागांत विभागू शकतात आणि स्टारफिशचा प्रत्येक अर्धा भाग पुन्हा पूर्णतः तयार झालेल्या स्टारफिशमध्ये वाढतो, त्याचे सर्व शरीराचे भाग, जसे की हात, डोळे आणि अंतर्गत अवयव हे दोन्ही भाग दोन वेगळे, पूर्णपणे कार्यरत स्टारफिश बनतात.

काही प्रकरणांमध्ये, एक स्टारफिश जाणूनबुजून स्वतःचा एक हात तोडतो आणि स्टारफिश नंतर गमावलेला हात परत वाढवतात. दरम्यान, वेगळा केलेला हात एका नवीन, पूर्णपणे तयार झालेल्या स्टारफिशप्रमाणे वाढतो.

Starfish can reproduce both asexually and sexually, depending on the circumstances. (Source: Freepik)
स्टारफिश परिस्थितीनुसार अलैंगिक आणि लैंगिक दोन्ही प्रकारे पुनरुत्पादन करू शकते. (स्रोत: फ्रीपिक)

३. पायथॉन/ अजगर ( Python)

२०१२ मध्ये जगातील सर्वात लांब साप असलेल्या बर्मी पायथॉनने केंटकी येथील प्राणिसंग्रहालयात नर जोडीदाराशिवाय पिल्लांना जन्म दिला. दोन वर्षांनंतर २०१४ मध्ये, थेल्मा नावाच्या २० फूट उंचीच्या मादी पायथॉनने दोन वर्षे नर पायथॉनजवळ नसतानाही ६१ अंडी दिली. थेल्मा ही दुसऱ्या मादी पायथॉनबरोबर राहत होती.

या दुर्मीळ घटनेला “कुमारी जन्म (virgin birth)” म्हणतात आणि तो अलैंगिक पुनरुत्पादनाचा एक प्रकार आहे.”

४. मार्बल्ड क्रेफिश (Marbled Crayfish)

१९९५ मध्ये एका जर्मन मत्स्यालयाच्या मालकाने क्रेफिशची एक नवीन प्रजाती शोधून काढली, जी स्वतःचे क्लोनिंग (cloning) करण्यास सक्षम होती. सर्व संतती मादी होत्या, ज्यामुळे पुष्टी होते की, मार्बल्ड क्रेफिश जोडीदाराची आवश्यकता नसतानाही पार्थेनोजेनेसिसद्वारे पुनरुत्पादन करतात.

५. हायड्रा ( Hydra)

हायड्रा हा लहान गोड्या पाण्यात राहणारा प्राणी आहे, जे उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात राहतात. त्यांच्याकडे पुनरुत्पादनाची एक विशेष पद्धत आहे, ज्याला “बडिंग” (budding) म्हणतात. जिथे त्यांच्या दंडगोलाकार शरीरावर लहान बड्स (buds) तयार होतात, हळूहळू लांब होतात, टे᠎̮न्‌टक्‌ल्‌ (tentacles -काही समुद्री प्राण्यांच्या पायासारखा एक लांब, पातळ, मऊ अवयव) विकसित करतात आणि अखेरीस पूर्णपणे तयार झालेला सजीव म्हणून वेगळे होतात. पर्यावरणीय परिस्थितीनुसार, हायड्रा दर काही दिवसांनी बड्स (buds) तयार करू शकतात.

Story img Loader