जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात चीन खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशांत ही दोन नावे अग्रस्थानी आहेत. पण एक असा देश आहे ज्याची लोकसंख्या फक्त आणि फक्त २७ आहे. आतापर्यंत सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश म्हणून व्हॅटीकन सिटी म्हणून ओळखला जायचा. या देशाची लोकसंख्या ८०० च्या आसपास होती. पण आता व्हॅटीकनलाही लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकत सीलँड हा स्वयंघोषीत देश पहिल्या क्रमांकावर आला आहे. दुस-या युद्धाच्या वेळी ब्रिटीश सैन्याने समुद्रात एक तात्पुरते तळ उभारले होते. त्यानंतर काही काळ या तळावर कोणाचेच वास्तव्य नव्हते. पण आता या तळावर राहणा-या लोकांनी या ठिकाणाला स्वतंत्र्य देश म्हणून घोषित केले आहे. या स्वयंघोषित देशाला मात्र आंतराष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही.
हेही वाचा : चंद्रावर सापडलेल्या खनिजातून समोर आले चंद्राचे खरे वय; काय सांगते नवीन संशोधन…
या स्वयंघोषित आणि २७ लोकसंख्या असलेल्या देशाचा एक स्वयंघोषित राजाही आहे. २०१२ मध्ये मायकल बेट्स नावाच्या व्यक्तीने स्व:ताला या देशाचा राजा म्हणून घोषित केले. नेदरलँडच्या काही लोकांनी हा देश जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी खासगी हेलिकॉप्टर वापरून बेट्स यांनी हा हल्ला परतवून लावला होता. आजही या समुद्रातून एखादी बोट फिरताना दिसली तर या बेटावर राहणारी लोक बोटीवर गोळीबार करतात. त्यामुळे याठिकाणी फारसे कोणी फिरत नाही. विशेष म्हणजे या स्वयंघोषित देशात उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही आहे पण जस जशी या छोट्याशा देशाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहचली तशी लोकांनी या देशाला आर्थिक मदत पुरवली आहे. सध्या फेसबुकवर या देशाचे अधिकृत पेज असून लाखो संख्येने फॉलोअर्स या पेजला आहेत. आतापर्यंत दुर्लक्षित असलेले हा देश सोशल मीडियामुळे खूपच प्रसिद्ध झाला आहे.
हेही वाचा : काकड आरती का करतात माहीत आहे का ? जाणून घ्या गावोगावची सुंदर परंपरा
जगात १९५ देश आहेत, त्यापैकी १९३ राष्ट्रांना संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. पण याशिवाय जगात अशी अनेक छोटी बेटे आहेत जी स्वतःला एक देश मानतात. या बेटांचा आकार म्हणजे क्षेत्रफळ घरातील परिसरापेक्षा लहान आहे. हा देश इंग्लंडमधील सफोक बीचपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. हा देश एका गडावर वसलेला आहे, जो गड आता मोडकळीस आला आहे. हा किल्ला दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनने विमानविरोधी संरक्षणात्मक तोफा ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणून बांधला होता, जो नंतर रिकामा करण्यात आला. उध्वस्त झालेल्या या किल्ल्याला रफ फोर्ट असेही म्हणतात. किल्ला रिकामा झाल्यानंतर तो अनेकांनी ताब्यात घेतला होता. १९६७ मध्ये रॉय बेट्स नावाच्या मेजरने त्याचा ताबा घेतला आणि ते आपल्या कुटुंबासह येथे राहू लागले. ९ ऑक्टोबर, २०१२ रोजी रॉय बेट्सच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मायकल रॉय बेट्स याने स्वतःला या देशाचा राजकुमार घोषित केले. हा देश ४००० चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेला आहे. या किल्ल्याला एक देश म्हणून कधीही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाही. पण तरीही ते स्वतःला वेगळे राष्ट्र मानतात. या देशाचे स्वतःचे संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, पासपोर्ट आणि चलन देखील आहे. या देशाची खास गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. २००२ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार येथील एकूण लोकसंख्या २७ आहे. परंतु येथे उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक इतर देशांत राहत आहेत. २०१५ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार या देशात फक्त २ लोक राहतात.