सध्या चित्रपट आणि त्यांची लांबी हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ची लांबी ही ३ तास २१ मिनिटे होती. याबरोबरच कोविड काळात आलेला आणि बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’सुद्धा तीन तासांचा होता. ऑस्करवारी करून येणारा राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’देखील जवळपास तीन तासांचा होता. एकूणच सध्या मोठ्या चित्रपटांची क्रेझ पुन्हा पाहायला मिळत आहे. आधी ज्याप्रमाणे दीड ते अडीच तासात चित्रपट पूर्ण व्हायचा तसं न होता जुन्या चित्रपटांच्या लांबीचा ट्रेंड पुन्हा सुरू झाला आहे.

याआधीपण भारतात ‘लगान’, ‘मोहब्बतें’, ‘मेरा नाम जोकर’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारखे मोठे चित्रपट प्रदर्शित झाले अन् चांगलेच गाजले. ‘एलओसी कारगिल’ हा चित्रपट तर तब्बल साडे चार तासांचा होता. पण तुम्हाला माहितीये की आजवरचा सर्वात मोठा चित्रपट कोणता आहे? हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर २-४ तास नव्हे तर तब्बल ३ दिवस तुम्हाला काढावे लागतील. हा नेमका चित्रपट आहे तरी कोणता तेच आपण आज जाणून घेणार आहोत.

Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…
Aamir Khan Karisma Kapoor Raja Hindustani kiss
“तीन दिवस…”, ‘राजा हिंदुस्तानी’तील आमिर खान-करिश्मा कपूरच्या किसिंग सीनबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

आणखी वाचा : ६५ वर्षीय दर्शन जरीवालांवर महिलेचे गंभीर आरोप; अभिनेत्यासह विवाह केल्याचा अन् गरोदर असल्याचा खुलासा

‘द क्योर फॉर इंसोमनिया’ हा चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात जास्त लांबीचा चित्रपट आहे. हा चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला होता. याच्या नावामुळेच या चित्रपटाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतलं जातं. या चित्रपटाचं दिग्दर्शन जॉन हेनरी टिमिस ४ यांनी केलं होतं. या चित्रपटाचा रन-टाइम ऐकून तुमचं डोकं चक्रावूनच जाईल. हा चित्रपट ५२२० मिनिटं मोठा होता. हा चित्रपट पूर्ण करायचं म्हंटलं तर जवळपास ३ दिवस अन् १५ मिनिटे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. असं नेमकं या चित्रपटात होतं तरी काय? याबद्दलच आपण माहिती घेऊया.

या चित्रपटाला कोणत्याही प्लॉट किंवा कथा नाही. यात फक्त एलडी ग्रोबन हे कलाकार त्यांची ४०८० पानांची कविता वाचन करताना पाहायला मिळतात. चित्रपटात काही ठिकाणी पोर्नोग्राफिक व्हिडीओ आणि हेवी मेटल म्युझिक आपल्याला आढळून येतं. ‘द क्योर फॉर इंसोमनिया’ हा चित्रपट सर्वप्रथम शिकागोच्या ‘स्कूल ऑफ द आर्ट इंस्टिट्यूट’मध्ये दाखवण्यात आला होता. ३१ जानेवारी १९८७ साली हा चित्रपट सुरू झाला अन् तो ३ फेब्रुवारीला संपला. हा चित्रपट तेव्हा सलग कोणताही ब्रेक न घेता दाखवण्यात आला होता.

longest-film2
फोटो : आयएमडीबी

असं म्हंटलं जातं की या चित्रपटाची कोणतीही कॉपी उपलब्ध नाही. शिवाय डीव्हीडी आणि व्हिडीओ फॉरमॅटमध्येही हा चित्रपट उपलब्ध नाही. या चित्रपटाच्या कॉपीज नेमक्या आहेत कुठे याचा कोणालाही पत्ता नाही. या सगळ्या कॉपीज हरवल्या गेल्या असल्याचं सांगितलं जातं. ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे खासकरून त्यांच्यासाठी हा चित्रपट काढण्यात आला होता. यामुळेच चित्रपटाचं नावही त्याच आजाराशी संबंधित ठेवलं गेलं होतं.