Expensive Dog Breeds In India : अनेकांना श्वान, मांजर, कासव हे प्राणी आणि पोपट, लव्ह बर्ड्स आदी पक्षी घरात पाळणे भरपूर आवडते. पण, सर्व पक्षी आणि प्राण्यांमध्ये श्वान हा असा प्राणी आहे, जो मानवाला अगदी जवळचा वाटत आला आहे. कधी मित्र, कधी घरातला सदस्य, कधी घराचा संरक्षक, तर कधी लहान मुलांचे मोठे भावंड अशी अनेक नाती तो आपल्याबरोबर जोडतो. त्यामुळे आपल्या जीवनात त्याचे अस्तित्व काय आहे याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे.

त्याचप्रमाणे श्वान, मांजर यांच्यासुद्धा अनेक प्रजाती आहेत. काही जण रस्त्यावरील श्वान, मांजराला घरात पाळण्यासाठी घेऊन येतात. तर अनेक जण हौसेने त्यांच्यासाठी भलीमोठी रक्कम मोजून, त्यांना खरेदी करून घरी आणतात. भारतातदेखील अनेक महागडे श्वान (Expensive Dog Breeds) विकले जातात. त्याचबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊ…

भारतात आढळणाऱ्या श्वानांच्या सर्वांत महागड्या जाती (Expensive Dog Breeds) खालीलप्रमाणे :

१. माल्टीज- या मेडिटेरियन (Mediterranean) श्वानाचे साथीदार आणि कौटुंबिक सदस्य होण्याच्या दृष्टीने प्रजनन केले जाते. हा खेळकर श्वान आहे आणि भारतात त्याची ५० हजार ते एक लाख २५ हजार रुपयांपर्यंत विक्री होते.

२. बोअरबोएल- याला इंग्लिश मास्टिफ, असेदेखील म्हणतात. हा दक्षिण आफ्रिकेतील कार्यरत श्वान आहे. ही विश्वासार्ह आणि हुशार जात भारतात एक लाख २५ हजार ते दोन लाख २५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

३. अफगाण हाउंड- या सुंदर व मोहक अशा श्वानांना शिकार खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. भारतात त्यांची किंमत दीड लाख ते चार लाख रुपयांदरम्यान आहे.

४. कोकेशियान माउंटन शेफर्ड- रशियाचा हा श्वान बलवान आणि धाडसी आहे. या केसाळ प्राण्याची भारतात दीड लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत विक्री होते.

५. अकिता इनू- हा श्वान मूळचा जपानचा आहे, जो अमेरिकेतही आढळतो. तसेच भारतामध्ये याची किंमत दीड लाख ते चार लाख रुपयांपर्यंत आहे.

६. न्यू फाउंडलँड- न्यू फाउंडलँड श्वान एखाद्या प्रौढ माणसाला वादळापासूनसुद्धा वाचवू शकतो. भारतात या श्वानाची किंमत दोन लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत आहे.

७. अलास्का मालाम्युट्स- अलास्का मालाम्युट्स कुत्र्यांच्या सर्वांत प्राचीन जातींपैकी एक आहेत. हे श्वान स्लेज खेचणे आणि मालवाहतूक अशी कामेही करतात. भारतातील याची किंमत दोन लाख ते साडेतीन लाख रुपयांदरम्यान आहे.

८. इंग्लिश मॅस्टिफ- इंग्लिश मॅस्टिफ ही जातही इंग्लंडचीच आहे. इंग्लिश मॅस्टिफ चांगले दिसतात. त्यांचे डोके मोठे आणि लव सोनेरी ते गडद तपकिरी किंवा सिल्व्हर फाऊनपर्यंत असते. भारतात या जातीची किंमत पाच लाख ते १० लाख रुपयांपर्यंत आहे.

९. रेड नोज पिटबुल टेरियर- भारतात रेड नोज पिटबुल टेरियर या जातीची किंमत ७५ हजार रुपयांपासून १५ लाख रुपयांपर्यंत आहे. ही जात मालकांचे रक्षण करते आणि लहान मुलांसाठीही सुरक्षित असते.

Story img Loader