रेल्वे ही कोट्यावधी लोकांची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांमध्ये भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं आहे. भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासासाठी सर्वाधिक रेल्वेचा वापर होतो. रेल्वे हे केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये कनेक्टिव्हिटीचे सर्वोत्तम साधन आहे. पण, रेल्वेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या लोकांना माहीत नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय रेल्‍वेबद्दल अशी माहिती देणार आहोत की, ज्याबद्दल तुम्‍हाला क्वचितच माहीत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण अनेकदा रेल्वे रुळावरून घसरण्याच्या बातम्या ऐकत असतो. रेल्वेच्या चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने ट्रेन रुळावरून घसरली, असंही अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. पण, खरंच अचानक ब्रेक दाबल्यावर रेल्वे रुळावरून खाली घसरते का? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात फिरत असतात. आज याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया खरं काय…

(हे ही वाचा: रेल्वेत जनरल डबा सुरुवातीला आणि शेवटी का असतो? तर एसी डबे नेहमी मध्यभागीच का असतात? जाणून घ्या खरं कारण)

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, इमर्जन्सी ब्रेक लावल्याने ट्रेन रुळावरून घसरते, पण हा गैरसमज आहे, असे एका रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन ब्रेकचा वापर केला जातो. जेव्हा लोको पायलट आपत्कालीन ब्रेक लावतो, तेव्हा ट्रेनच्या प्रत्येक चाकामध्ये ब्रेकिंग फोर्स समान असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर ट्रेनच्या प्रत्येक चाकावर ब्रेक प्रेशर समान रीतीने लागू केले जाते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक लावल्यास ट्रेन थांबते. आपत्कालीन परिस्थितीत, रेल्वेचालकाने इमर्जन्सी ब्रेकचा वापर केला तरी ट्रेन रुळावरून घसरण्याचा धोका नसतो.

आता प्रश्न असा आहे की, लोको पायलट नेहमी इमर्जन्सी ब्रेक का वापरत नाही. कारण ब्रेक न लावल्यामुळे अनेकवेळा ट्रेन दुसऱ्या ट्रेनला धडकते आणि माणसांनाही जीव गमवावा लागतो. बऱ्याच लोकांचा असाही दावा आहे की, ट्रेन वेगाने प्रवास करत असताना ताबडतोब ब्रेक लावल्याने ट्रेन रुळावरून घसरू शकते. आता सोप्या भाषेत समजून घ्या की, इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली असती तर ट्रेनमध्ये इमर्जन्सी ब्रेक्स दिलेच गेले नसते. ट्रेनची दोन्ही चाके आणि ट्रॅक धातूचे बनलेले आहेत, ज्यामुळे दोघांमधील घर्षण खूप कमी असते. ट्रेनचे वजन जास्त आहे, त्यामुळे ट्रेनला थांबण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता असते. जेव्हा ट्रेनचा लोको पायलट इमर्जन्सी ब्रेक लावूनही ट्रेन थांबवितो तेव्हा गाडी काही अंतरावर जाऊन थांबते. अशा स्थितीत लोको पायलटला गाडीसमोर कोणी आले म्हणून गाडी थांबवायची असेल तर त्याला ते लांबूनच दिसणे आवश्यक आहे.