Polytrauma : जगभरात अनेक नवनवे तंत्रज्ञान आले आहे. मात्र, तरीही अपघातांची संख्या रोखण्यात सर्वच देश अपयशी ठरत असल्याचं आपल्याला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून भारतात देखील अपघातामुळे मृत्यू होणार्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. देशात दरवर्षी लाखो लोकांचा अपघात मृत्यू होतो. खरं तर अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सरकारकडून देखील प्रयत्न केले जातात. मात्र, अपघात कमी होण्याचे नाव घेत नाही. अपघातात अवयवांना गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू होतो. असे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.
अपघातामुळे अनेकदा आपल्या शरीराला अनेक जखमा होतात. अपघातामध्ये हात, पाय, गुडघे, डोके इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर जखमा होतात. एखाद्या रुग्णाला एकाच वेळी अनेक गंभीर दुखापती झाल्या तर त्याला पॉलीट्रॉमा असं म्हटलं जातं. गंभीर जखमा झाल्यामुळे काहींचा मृत्यू झालेली अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, मग प्रश्न असा पडतो की, पॉलीट्रॉमा म्हणजे काय? पॉलीट्रॉमा कशाला म्हटलं जातं? थोडक्यात जाणून घेऊयात.
हेही वाचा : History Of Clock : घड्याळाचे काटे उजवीकडून डावीकडे का फिरतात? माहितीये का? जाणून घ्या!
पॉलीट्रॉमा म्हणजे काय?
ज्यावेळी एखाद्या अपघाताची घटना घडते. तेव्हा अपघातात एखाद्या रुग्णाला एकाच वेळी अनेक गंभीर दुखापती होऊ शकतात. एकाचवेळी अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत एखाद्या व्यक्तीच्या स्थितीचे वर्णन करताना त्याला पॉलीट्रॉमा असं म्हटलं जातं. यामध्ये देखील दोन संज्ञा असतात. पॉलीट्रॉमा आणि मल्टिपल ट्रॉमा या वैद्यकीय संज्ञा असतात. आघातजन्य जखमा झालेल्या असल्यास वैद्यकीय भाषेत पॉलीट्रॉमाला म्हटलं जातं.
दरम्यान, पॉलीट्रॉमामध्ये जखम एवढ्या गंभीर असतात की त्या जखमा शरीरावर गंभीर परिणाम करतात. पॉलीट्रॉमामुळे पीडित रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबीयांवर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या विपरित परिणाम देखील होऊ शकतो. खरं तर पॉलीट्रॉमा टाळण्याठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. दरम्यान, एखाद्याला पॉलीट्रॉमा झाल्यास सर्वात आधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास कधीही चांगलं. पॉलीट्रॉमा म्हणजे एका व्यक्तीला विविध ठिकाणी दुखापती होणं. या केसमध्ये रुग्णाला तात्काळ उपचारांची गरज असते. पॉलीट्रॉमा झालेल्या बऱ्याच मृत्यूंचे कारण बहुधा डोक्याला होणाऱ्या दुखापती असतात. त्यामुळे काळजी घेणं आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अधिक आवश्यक असतं.