What is TRP : दर आठवड्याला टेलिव्हिजनवरचे विविध शो आणि मालिका यांचा टीआरपी नेमका किती आहे याची अधिकृत आकडेवारी BARC कडून प्रसिद्ध केली जाते. अमूक एक मालिका टीआरपीत अव्वल स्थानी आहे किंवा एखाद्या वाहिनीचा टीआरपी घसरला अशा चर्चा नेहमीच आपल्या कानावर येतात. अनेकदा कमी टीआरपीमुळे प्रसारित होणाऱ्या मालिकांना लवकर गाशा गुंडाळावा लागतो, तर जोखमीच्या परिस्थितीत चॅनेल सुद्धा बंद करावं लागतं. हा टीआरपी म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजला जातो? जाणून घेऊयात…

TRP म्हणजे काय?

टीआरपीला ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट’ असं म्हणतात. टीआरपी हे एक असं साधन आहे ज्याद्वारे टेलिव्हिजनवरचा कोणता कार्यक्रम किती वेळ पाहिला जातो याची आकडेवारी मोजण्यात येते. यामुळे चॅनेलची लोकप्रियता समजण्यास मदत होते. एखाद्या कार्यक्रमाला जास्त टीआरपी मिळत असेल याचा अर्थ तो कार्यक्रम जास्तीत जास्त प्रेक्षक पाहत आहेत. जाहिरातदारांना या टीआरपी आकडेवारीचा खूप फायदा होता. या आकडेवारीवरून संबंधित कार्यक्रमांना कोणत्या जाहिराती दिल्या जाणार याची निवड केली जाते.

हेही वाचा : Sarpanch Salary: सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळतं? जाणून घ्या

What is TRP : टीआरपी म्हणजे काय?

हेही वाचा : Trips Under 1 Lakh From India: एक लाखात तुम्ही फिरू शकता हे पाच देश; आता बजेटची चिंता सोडा! ‘ही’ यादी पाहा

TRP ची गणना ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ या भारतीय एजन्सीद्वारे ‘BAR-O-meters’ वापरून केली जाते. BARC कडून दर गुरुवारी सर्व टीव्ही चॅनेल आणि टीव्ही कार्यक्रमांच्या क्रमवारीचा साप्ताहिक TRP निकाल प्रकाशित केला जातो.

BARC ने ४५ हजारांपेक्षा जास्त घरांमध्ये ‘BAR-O-meters’ बसवले आहेत. याद्वारे कोणते कार्यक्रम सर्वाधिक पाहिले जातात याचं सर्वेक्षण केलं जातं. ‘BAR-O-meters’ हे गॅझेट कुटुंबातील सदस्यांनी कोणते चॅनेल्स किंवा कार्यक्रम पाहिलेत याचा डेटा रेकॉर्ड करतं. ‘BAR-O-meters’ ला ‘पीपल मीटर’ असंही म्हणतात.

हेही वाचा : Udyogini Scheme : महिलांसाठी सरकारने आणलेली ‘उद्योगिनी’ योजना नेमकी काय आहे? अर्ज कसा कराल?

BARC म्हणजे काय?

२०१४ मध्ये स्थापन झालेली ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (BARC) ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षक मापन संस्था आहे. BARC Indiaने सध्या देशभरात २२ हजारांहून अधिक ‘BAR-O-meters’ बसवलेले आहेत. सुरुवातीला २७७ चॅनेल्सने BARC चं सदस्यत्व घेतलं होतं. यात आता वाढ होऊन ही संख्या ४७० हून अधिक झाली आहे.