जेवणात आवडती भाजी नसेल, तर शेजवान चटणी किंवा सुकी चटणी (शेंगदाण्याची चटणी) घेऊन आपण ती पोळीला लावून किंवा पोळीबरोबर खातो. चटणीशिवाय काही विशिष्ट पदार्थांना चव येत नाही. जसे की वडापाव, समोसा, इडली, पकोडे, डोसा आदी पदार्थ चटणीसोबत खाण्याची एक वेगळीच मजा असते. पण, तुम्हाला माहीत आहे का? सगळ्यात पहिल्यांदा चटणी केव्हा बनवली गेली होती? तर आज आपण चटणीचे नाव कसे ठेवले गेले, केव्हा पहिल्यांदा चटणी बनवण्यात आली यामागचा इतिहास जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्यांदा केव्हा बनवली चटणी?

शहाजहानच्या कारकिर्दीत पहिल्यांदा चटणी बनवली गेली होती. गोष्ट अशी आहे की, एकदा शहाजहानची तब्येत खूपच बिघडली होती. त्याने यादरम्यान खाणे-पिणे बंद केले होते. आजारी असल्यावर जशी कोणत्याही पदार्थाची आपल्याला चव येत नाही, तसेच शहाजहानचेसुद्धा झाले होते. मग त्यांच्या वैद्यांनी त्यांना काही तरी मसालेदार पदार्थ बनवून खायला द्या; जे सहज पचेल, असे सांगितले होते. तेव्हा काही कडधान्ये आणि डाळींचा उपयोग करून पहिल्यांदा चटणी बनवण्यात आली. मग त्यात पुदिना, कोथिंबीर यांचा समावेश केला जाऊ लागला.

हेही वाचा…लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असणारी त्सुनामी नेमकी कशी येते आणि त्यामागची कारणे काय? जाणून घ्या….

चटणी हे नाव कसे ठरवले गेले?

हा पदार्थ चाटून खाल्ला जायचा म्हणूनचे याचे नाव चटणी, असे ठेवले गेले. चटणी हा संस्कृत शब्द आहे. पुदिना आणि चिंचेची चटणी सगळ्यात पहिल्यांदा बनवण्यात आली होती. त्यानंतर शहाजहानसाठी खजुराची गोड चटणीसुद्धा बनवण्यात आली. तेव्हापासून भारतात आज विविध प्रकारच्या चटणी बनवल्या जातात आणि आवडीने खाल्ल्या जातात.

आता बाजारात विविध प्रकारच्या चटण्या उपलब्ध आहेत. गोड, तिखट, आंबट अशा अनेक चटण्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. चिंच, पुदिना, ओले खोबरे, खजूर, कांदा-टोमॅटो इत्यादी अनेक चटण्या आपापल्या आवडीनुसार घरी बनवल्या जातात किंवा बाहेरून विकत आणल्या जातात. तसेच प्रत्येकाची चटणी बनवण्याचीसुद्धा वेगळी पद्धत असते; जी पदार्थांना आणखी जास्त चविष्ट बनवते.