which animal has the most teeth : दात हे मानवी शरीराच्या सर्वांत आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक आहेत, जे आपल्या एकूण आरोग्य आणि कल्याणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. माणसांना ३२ दात असतात हे सर्वांना माहीत आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, प्राण्यांना किती दात असतात? तुम्हाला माहीत आहे का की, काही प्राण्यांना खूप दात असतात? सर्वांत जास्त असलेला प्राणी कोणता आहे माहीत आहे का? चला तर मग, सर्वांत जास्त दात असलेल्या १० प्राण्यांबद्दल जाणून घेऊ…
सर्वांत जास्त दात असलेले १० प्राणी (10 animals with the maximum number of teeth)
रेनबो स्लग (Rainbow Slug)
या जलचराला त्याच्या दोलायमान (vibrant) रंगांवरून नाव देण्यात आले आहे, त्याला ७,००,००० पेक्षा जास्त दात आहेत. रॅडुला म्हणून ओळखले जाणारे हे दात या जलचराला अन्न बाहेर काढण्यास मदत करतात
हेही वाचा – विमान उड्डाण करताना तुम्ही फोन ‘एअरप्लेन’ मोडवर न ठेवल्यास काय होते? तज्ज्ञांनी केला खुलासा….
विशाल आर्माडिलो (Giant armadillo)
दक्षिण अमेरिका खंडातील मूळ रहिवासी असलेल्या विशाल आर्माडिलोला ८० ते १०० दात असू शकतात. हे पेगसारखे दात (लहान, शंकूच्या आकाराचे दात जे सामान्य दातांपेक्षा लहान असतात) आयुष्यभर वाढतात, असे म्हणतात, ज्यामुळे त्यांना मातीच्या कठीण थरातून कीटक बाहेर काढण्यास मदत मिळते.
ग्रेट व्हाईट शार्क (Great White Shark )
ग्रेट व्हाईट शार्कला त्यांच्या आयुष्यात ३५,००० दात असू शकतात. अनेकदा ते बदलांशी जुळवून घेतात आणि त्यांच्या जीवनात ते पुन्हा वाढू शकतात; जेणेकरून ते त्यांचे अन्न असलेल्या भक्ष्याची शिकार करण्यासाठी तो स्वत:ला सुसज्ज करतो.
सरगॅसम फ्रॉगफिश (Sargassum frogfish)
सरगॅसम फ्रॉगफिश त्याच्या शिकारी स्वभावासाठी ओळखला जातो आणि तो स्वतःहून मोठा शिकार करू शकतो. भक्ष्य खाण्यासाठी शेकडो लहान तीक्ष्ण दात असलेला हा एक भक्षक शिकारी आहे.
हेही वाचा –भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे महाराष्ट्रात! ‘या’ गावातील शेतकरी आहेत कोट्याधीश अन् लक्षाधीश
खाऱ्या पाण्यातील मगर ( Saltwater Crocodile)
खाऱ्या पाण्यातील मगरीला सरासरी ८० दात असतात. मगरी जवळजवळ प्रत्येक २० महिन्यांनी त्यांचे दात बदलतात आणि या अंतराने नवीन दात वाढतात. त्यांना वरच्या जबड्याच्या प्रत्येक बाजूला १८ दात आणि खालच्या जबड्याच्या प्रत्येक बाजूला १५ दात असतात.
आफ्रिकन हत्ती (African Elephant)
भव्य आफ्रिकन हत्तीला २६ दात आहेत. पण, त्यांच्या आयुष्यात सहा दाढा (molars) वाढतात, असे म्हटले जाते; ज्याचे वजन अनेक किलोग्रॅमपर्यंत असू शकते.
लहान तपकिरी वटवाघुळ (Little brown bat)
लहान तपकिरी वटवाघळाला ३८ पर्यंत तीक्ष्ण आणि विशेष दात असू शकतात. मात्र, ही वटवाघळं इतकी लहान आहेत की, ती कधीही मोठ्या प्राण्यांना चावू शकत नाहीत.
चॅनेल कॅटफिश (Channel catfish)
चॅनेल कॅटफिशच्या तोंडात आणि घशात हजारो लहान ब्रशसारखे दात असल्याचे म्हटले जाते. ही उत्तर अमेरिकेतील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेली कॅटफिश प्रजाती आहे आणि बोली भाषेत ‘चॅनेल कॅट’ म्हणून ओळखली जाते.
हेही वाचा –जगातील सर्वात महागडा दात कोणाचा आहे माहित्येय का? एका दाताची किंमत आहे….
बागेतील गोगलगाय (Garden snail)
क सामान्य बागेतील गोगलगाय तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक अद्वितीय आहे. गोगलगाईला सुमारे १४,००० सूक्ष्म दात आहेत, जे त्याच्या जिभेवर ओळीत असतात.
बॉटलनोज डॉल्फिन (Bottlenose dolphin)
बॉटलनोज डॉल्फिनला २५० दात आहेत, ज्यांचा उपयोग तो भक्ष्याची शिकार करण्यासाठी करतो. हे दात त्यांच्या शिकार आणि जगण्याच्या कौशल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.