ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. सगळ्यांच्या आवडीचा हा पिस्ता चवीला किंचित गोड असतो. तसंच पिस्ता खाण्याचे खूप आरोग्य फायदेदेखील आहेत. पिस्त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.

पिस्ता खाल्ल्याने आपली चयापचय क्षमता वाढते, ज्यामुळे सर्दी आणि इतर आजारांपासून आपण दूर राहतो. पण, एवढे आरोग्यदायी फायदे देणाऱ्या पिस्त्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते हे तुम्हाला तुम्हाला माहीत आहे का?

पिस्त्याचे सर्वाधिक उत्पादक

एकूण उत्पादनापैकी जवळजवळ ९०% उत्पादनासह अमेरिका पिस्त्याचा सर्वाधिक उत्पादक देश म्हणून ओळखला जातो.

जागतिक बाजारपेठेतील वाटा

२०२१ मध्ये अमेरिकेने ५,२८,००० मेट्रिक टन (MT) पेक्षा जास्त पिस्त्याचे उत्पादन केले, जे एकूण पिस्त्याच्या ७०% होते.

अमेरिकेतील आघाडीचे राज्य

कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील एक राज्य आहे, जे पिस्त्याचे आघाडीचे उत्पादक म्हणून लोकप्रिय आहे. अमेरिका १९७६ पासून एक यशस्वी उत्पादक आहे.

इतर उत्पादक देश

जगातील इतर काही पिस्ता उत्पादक देश म्हणजे सीरिया, अफगाणिस्तान व स्पेन.

वैज्ञानिक नाव

पिस्तासिया व्हेरा (Pistacia vera) हे पिस्त्याचे वैज्ञानिक नाव आहे. पिस्ता आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त

वाढत्या वजन आणि लठ्ठपणाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी पिस्ता हा एक चांगला पर्याय असू शकतो. पिस्त्यामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात; परंतु त्यात फायबर आणि पाणी जास्त असते. त्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.

Story img Loader