World’s Smallest Country: भारतात, जिथे लोकं एकत्र कुटुंबात राहतात, तिथे एकाच घरात २५-३० लोकं राहतात. पण जगात एक असा देश आहे जिथे एकूण लोकसंख्या ३० पेक्षाही कमी आहे. हे जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटते. या लहान देशांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अनेकदा मोठ्या देशांबद्दल जगात बोलले जाते, कारण या देशांची कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. मात्र, जगातील लहान देशांची चर्चा क्वचितच होते. ३० पेक्षाही कमी लोकं असलेला हा देश जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो. चला तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश

जगात चीन, रशिया, भारत आणि अमेरिका असे मोठे क्षेत्रफळ असलेले देश आहेत. या देशांची लोकसंख्या कोटींच्या घरात आहे पण तुम्हाला माहित आहे का असा एक देश आहे जिथे फक्त २७ लोकं राहतात. या देशाचे नाव सीलँड आहे, जो उत्तर समुद्रात आहे. हे इंग्लंडच्या सफोकच्या किनाऱ्यापासून १० किमी अंतरावर आहे. हा छोटासा देश एका उद्धवस्त सागरी किल्ल्यावर वसलेलं आहे. हा देश एवढा छोटा आहे की, तुम्हाला तो गुगल मॅपवरही सापडत नाही. 

हा किल्ला दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनने बांधला होता. तो नंतर ब्रिटनने रिकामा केला. तेव्हापासून ‘माइक्रो नेशन’ म्हटलं जाणारं सीलँड वेगवेगळ्या लोकांच्या ताब्यात गेला. सीलँड देशाचं क्षेत्रफळ खूपच कमी आहे. सीलँडचे एकूण क्षेत्रफळ २५० मीटर आहे. क्षेत्रफळ फारच कमी असल्यानं तिथे उपजिविकेचं कोणतेही साधन नाहीये.

(हे ही वाचा : भारतातील ‘या’ ५ रेल्वे स्टेशनवरुन परदेशात जातात ट्रेन; एका स्थानकावरुन तर थेट पायी चालत दुसऱ्या देशात जाऊ शकता! )

सुमारे १३ वर्षांपूर्वी, ९ ऑक्टोबर २०१२ रोजी, रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वत: ला सीलँडचा राजकुमार घोषित केले. बेट्सच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा मायकेल याने राज्य केले. या लहान देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. पण या देशाचे स्वतःचे संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, पासपोर्ट आणि चलन देखील आहे. या देशाची खास गोष्ट म्हणजे, येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.

सीलँड आता हे ठिकाण पर्यटन स्थळ बनले आहे आणि रिपोर्ट्सनुसार, येथे जाण्यासाठी व्हिसा लागतो, म्हणजेच आधी परवानगी घ्यावी लागते. सध्या असे मानले जाते की, येथे ५० पेक्षा कमी लोक राहतात. जर आपण त्याच्या भविष्याबद्दल बोललो तर सीलँडचे भविष्य अनिश्चित आहे. हे शक्य आहे की, सीलँडला अखेरीस सार्वभौम राज्य म्हणून मान्यता मिळू शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know which is the smallest country in the world only 27 people live there pdb