पूर्वी पैसे काढण्यासाठी ग्राहकांना बँकांमध्ये रांगेत तासंतास ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र एटीएमच्या सुविधेमुळे पैसे काढणे सहज शक्य झाले आहे. आता लोक आपल्या घराजवळील कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीनमध्ये जाऊन सहज पैसे काढतात. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी चार अंकी पिन कोडची गरज असते. एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकल्यानंतर चार अंकी पिन कोड टाकल्याशिवाय पैसे काढता येत नाहीत, त्यामुळे या चार अंकी पिन कोडला खूप महत्त्व असते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही का की, एटीएम पिनकोड फक्त चार अंकीच का असतो, चला तर मग जाणून घेऊ…

आपण आता एटीएम मशीनमधून चार अंकी पिन कोड टाकून पैसे काढतो, पण सुरुवातीला सहा अंकी पिन कोड टाकून पैसे काढले जात होते. कारण चार अंकी पिनकोडपेक्षा सहा अंकी पिनकोड सुरक्षेच्या दृष्टीने चांगला मानला जात होता. पण अनेकदा लोकांना सहा अंकी पिनकोड लक्षात राहत नव्हता, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यानंतर आता एटीएम पिन कोड चार अंकी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?

आता खूप कमी बँकांच्या एटीएम कार्डसाठी सहा अंकी पिनकोड वापरला जातो. जगभरातील अनेक देशांमध्येही एटीएम कार्डसाठी सहा अंकी पिनकोड आहे. चारऐवजी जर सहा अंकी पिनकोड असेल तर कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा पिन पटकन लक्षात ठेवता येत नाही. यामुळे पिन हॅक होण्याची शक्यताही खूप कमी होते.

लेऽऽऽ पार्टी! आता ऑफिसमध्ये सुरु होणार बार, कर्मचाऱ्यांना मिळणार दारू; भारतातील ‘या’ राज्याने घेतला निर्णय

एटीएमचा चार अंकी पिनकोड ०००० आणि ९९९९ या दरम्यान असतो. यातून १०००० वेगवेगळे पिन नंबर ठेवता येतात. ज्यामध्ये २० टक्के लोकांचे एटीएम पिन हॅक होण्याची शक्यता असते. यामुळे चार अंकी पिनपेक्षा सहा अंकी पिन अधिक सुरक्षित मानला जातो.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तीने एटीएमचा शोध लावला त्याचा जन्म भारतात झाला होता. स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी १९६९ मध्ये एटीएम मशीनचा शोध लावला. एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांचा जन्म ईशान्य भारतातील शिलाँग शहरात झाला. त्याच्या या शोधामुळे आज लोकांची मोठ्या समस्येतून सुटका झाली आहे.

Story img Loader