देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करणं सुरक्षित, सोईचं व परवडणारं वाटतं. रेल्वेनं प्रवास करायला बहुतेक जणांना आवडतं. ट्रेनमध्ये कंटाळा आला, असं म्हणणारा क्वचितच कोणी असेल. पण, रेल्वेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या लोकांना माहीत नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय रेल्‍वेबद्दल अशी माहिती देणार आहोत की, ज्याबद्दल तुम्‍हाला क्वचितच माहीत असेल. तुम्ही अनेकदा सुरुवातीला किंवा शेवटी जनरल डबे पाहिले असतील. रेल्वे कोणतीही असो, तिच्या सुरुवातीला किंवा शेवटीच जनरल डबे का जोडण्यात येतात; तसेच एसी आणि स्लीपर कोच रेल्वेच्या मध्यभागी का लावले असतात? हे प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आले असतील? मग तुम्हाला मिळालीत का त्यांची उत्तरं? नाहीत. हरकत नाही. चला, ही माहिती आपण जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेगाडीच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतात जनरल डबे?

प्रत्येक रेल्वेगाडीची रचना जवळपास सारखीच असते. म्हणजेच इंजिन नंतर किंवा अगदी शेवटी, जनरल डबा आणि मध्यभागी AC-3, AC-2 व स्लीपर कोच जोडले जातात. खरं तर प्रत्येक रेल्वेगाडीच्या शेवटी आणि सुरुवातीला जनरल डबे असतात. त्यामागील कारणदेखील खूप महत्त्वाचं आहे.

भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोईसाठी या क्रमानं रेल्वे डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. खरं तर प्रवाशांची सोय लक्षात घेता, रेल्वेचे डबे या पद्धतीने लावलेले असतात. कोणत्याही रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये प्रवाशांची सर्वांत जास्त गर्दी असते. प्रत्येक स्थानकावरून चढणारे आणि उतरणारे प्रवासीही मोठ्या संख्येने असतात. अशात जर जनरल डबे मधे असले, तर जास्त भार मधे पडेल आणि त्यामुळे रेल्वेगा़डीचं संतुलन बिघडू शकतं. असं झालं, तर प्रवाशांना चढण्या-उतरण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. जनरल डबे मागे-पुढे लावल्याने रेल्वेगाडीचा समतोलही योग्य रीतीनं सांभाळला जातो. त्याचप्रमाणे अपघात झाल्यास ट्रेनच्या मधोमध जनरल डबा ठेवल्यास गर्दीमुळे बचावकार्यात अडचणी येऊ शकतात. जनरल डबे मागे-पुढे असल्याने बचाव व मदतकार्य सोपे होऊ शकते. त्यासोबतच छोट्याशा गावासारख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना त्यांचे डबे शोधण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठीही ट्रेनच्या सुरुवातीला किंवा शेवटी जनरल डबे लावले जातात.

रेल्वेत मध्यभागीच का असतात एसी आणि स्लीपर कोच?

माहितीनुसार, रेल्वेत कोचचा क्रम हा सुविधा आणि सुरक्षा लक्षात घेऊन ठेवला जातो. त्यानुसारच रेल्वेगा़डीचं डिझाईन केलं जातं. अप्पर क्लास डबा, लेडिज डबा हे रेल्वेच्या मध्यभागी असतात; तर सर्वाधिक गर्दीचे जनरल डबे हे अग्रभागी आणि सर्वांत शेवटी असतात. ट्रेन स्थानकावर थांबल्यानंतर एसी कोचमधून प्रवास करणारे प्रवासी सहजपणे स्थानकामध्ये प्रवेश करू शकतात किंवा बाहेर पडू शकतात. जनरल डबे रेल्वेच्या इंजिनाजवळ किंवा गार्डच्या डब्याजवळ असतात. त्यामुळे त्यामध्ये चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या लोकांची गर्दी संपूर्ण स्थानकावर विभागली जाते. परिणामी स्थानक आणि ट्रेनची सुरक्षा व्यवस्था राखण्यास मदत होते. प्रवाशांच्या सोईसाठीच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची अशा रीतीनं रचना करण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why are the general coaches of the train always placed at the front or back pdb
Show comments