Diesel Vs Petrol Car Mileage: देशातील अनेक लोकं कारचा वापर करतात. पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने लोक आता एकतर सीएनजी (CNG) किंवा जास्त मायलेज असलेल्या कारकडे वळू लागले आहेत. आता बहुतांश लोकं कार खरेदी करताना जास्त मायलेजचा विचार करतात. भारतात डिझेल वाहनांची विशेष मागणी आहे. ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन पेट्रोल तसेच डिझेलचे प्रकारही बाजारात आणतात. पण जवळपास गेल्या एका वर्षात डिझेल कारची विक्री कमी झाली आहे. वास्तविक, बीएस-६ नॉर्म्स भारतात लागू झाल्यानंतर सर्व वाहन कंपन्या डिझेल कार कमी प्रमाणात बनवत आहेत. भारतात डिझेल कारच्या मागणी मागील अनेक कारणे आहेत. डिझेल कार पेट्रोलपेक्षा अधिक मायलेज देतात.

दररोज लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवास करणारे लोक पेट्रोलपेक्षा डिझेल कार खरेदी करणे पसंत करतात. कारण पेट्रोलसह प्रवास करणे महागडे ठरते. पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार जास्त मायलेज देतात, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, आपल्यापैकी अनेकजण असतील ज्यांना पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार जास्त मायलेज का देतात हे माहीत नसेल. यामागे काय कारण आहे, चला, तर मग यामागचं कारण आज आपण समजून घेऊया.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Petrol and Diesel Prices On 7th November
Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील इंधनाचा दर तपासा

(हे ही वाचा : भारतातील मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? पाकिस्तानचा कोड काय? हे कोण ठरवतं? जाणून घ्या…)

पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार जास्त मायलेज का देतात?

पेट्रोल आणि डिझेल दोन्ही जीवाश्म इंधनापासून बनवले जातात परंतु त्यांच्यात खूप फरक आहे. या दोन्हीमध्ये हायड्रोकार्बन्स असतात. म्हणजेच कार्बन आणि हायड्रोजनचे रेणू आहेत. पण, पेट्रोलच्या तुलनेत डिझेलमध्ये कार्बनचे रेणू जास्त आणि हायड्रोजनचे रेणू कमी असतात. याव्यतिरिक्त, पेट्रोलला कमी तापमानात आग लागते तर डिझेलला जाळण्यासाठी जास्त तापमान लागते. म्हणूनच या दोन इंधनांसाठी इंजिन वेगळ्या पद्धतीने बनवले जातात.

पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिने जास्त कॉम्प्रेशन रेशोवर काम करतात. डिझेल इंजिनमध्ये इंधन टाकण्यापूर्वी, हवा अधिक संकुचित केली जाते, ज्यामुळे ती गरम होते आणि नंतर ज्वलन होते. उच्च कॉम्प्रेशन रेशोमुळे, डिझेल इंधन अधिक कार्यक्षमतेने ज्वलन केले जाऊ शकते. याशिवाय डिझेलमध्ये पेट्रोलपेक्षा जास्त ऊर्जा घनता असते. याचा अर्थ डिझेल पेट्रोलच्या तुलनेत तेवढ्याच प्रमाणात वीज निर्माण करू शकते.

जेव्हा इंजिनमध्ये डिझेल जळते तेव्हा ते पेट्रोलच्या तुलनेत प्रति युनिट जास्त ऊर्जा निर्माण करते. यामुळे कमी इंधनात कार अधिक धावू शकते. या सर्व कारणांमुळे डिझेल इंजिन असलेल्या गाड्या जास्त मायलेज देऊ शकतात.