India Country Code: बदलत्या डिजीटल युगात मोबाईल केवळ मनोरंजनाची नाही तर जीवनातील अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. आपल्या रोजच्या जीवनातील कितीतरी गोष्टी या संपूर्णपणे मोबाईलवर अवलंबून असतात. मोबाईल फोन वापरला जाणारा सर्वात महत्वाचा कार्य म्हणजे कॉलिंग. तुमच्या मोबाईल फोनवर फक्त काही नंबर दाबून तुम्ही शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीशी काही सेकंदात सहज बोलू शकता.

कॉल करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का की, मोबाईल नंबरच्या पुढे +९१ कोड लिहिलेला असतो? कदाचित आपल्यापैकी बहुतेकांना हे माहित असेल की हा भारताचा कोड आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारताचा कोड फक्त +९१ का ठेवण्यात आला आहे. कंट्री कॉलिंग कोड (Country Calling Code) कसे ठरवले जातात आणि ते कोण ठरवतं. यासाठी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. चला, आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर देत आहोत.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

कंट्री कॉलिंग कोड कसे ठरवले जातात आणि ते कोण ठरवते? यासाठी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजे काय? इंटरनॅशनल डायरेक्ट डायलिंग म्हणजे काय? या सर्वांची माहिती आज आपण जाणून घेऊया…

(हे ही वाचा : तुमच्या मोबाईलमध्ये अचानक LTE किंवा VoLTE का लिहिलेलं दिसतं माहितीये? कारण वाचून व्हाल अवाक्… )

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजे काय?

देश कॉलिंग कोड किंवा देश डायल-इन कोड टेलिफोन नंबरच्या पुढे वापरले जातात. त्याच्या मदतीने, एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) सदस्यांशी किंवा प्रदेशातील टेलिफोन ग्राहकांशी जोडले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, भारतासाठी हा कोड +९१ आहे. तर पाकिस्तानचा डायल कोड +९२ आहे. या कोडना ‘आंतरराष्ट्रीय ग्राहक डायलिंग’ असेही म्हणतात. ITU म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही एक विशेष एजन्सी आहे, जी संयुक्त राष्ट्रांचा भाग आहे.

ही एजन्सी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांवर काम करते. १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ युनियन म्हणून त्याची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. एकूण १९३ देश या संघाचा भाग आहेत. देश कोड देणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. म्हणजेच या एजन्सीने भारताला +९१ कोड दिला आहे.

भारताला +91 कोड का मिळाला?

देश कोड आंतरराष्ट्रीय टेलिफोन नंबरिंग योजनेचा भाग आहेत. एका देशातून दुसर्‍या देशात कॉल करताना हे वापरले जातात. हा कोड तुमच्या देशात आपोआप येतो, पण आंतरराष्ट्रीय नंबर डायल करण्यासाठी तुम्हाला हा कोड वापरावा लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशातील दुसर्‍या स्थानिक वापरकर्त्याला कॉल करता तेव्हा हा कोड आपोआप वापरला जातो. पण आंतरराष्ट्रीय कॉलमध्ये तुम्हाला हा कोड वेगळा वापरावा लागेल.

कोणत्या देशाला कोणता कोड मिळेल हे त्याच्या झोन आणि झोनमधील क्रमांकाच्या आधारे ठरवले जाते. भारत नवव्या झोनचा भाग आहे, ज्यामध्ये मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील बहुतेक देशांचा समावेश आहे. येथे भारताला १ कोड मिळाला आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय डायलिंग कोड +९१ आहे. तुर्कस्तानचा कोड +९०, पाकिस्तान +९२, अफगाणिस्तान +९३ आणि श्रीलंकेचा +९४ आहे.