आजकाल प्रवास करणं आधीपेक्षा खूप सोपं झालं आहे. हल्लीच्या वेगवान जीवनात आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहचायचे असेल तर विमानासारखा सध्या तरी दुसरा पर्याय नाही. विमानाने हजारो किमीचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येत असतो. अनेक लोक विमानाने प्रवास करतात. विमानाने प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण पहिल्यांदाच विमानामधून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी विमान प्रवास हा तेवढाच भीतीदायक असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्यापैकी अनेकांनी कधी ना कधी विमानाने प्रवास केला असेल आणि केला नसेल तरीही तुम्हाला विमानाचे काही नियम माहित असतीलच. जसे, फ्लाइटमध्ये सीट बेल्ट कधी लावायचा, टॉयलेट कधी वापरायचे, सीटसमोरचे स्टँड कधी उघडायचे आणि कधी बंद करायचे इ. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला एका अशा सत्याविषयी सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल. टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी फ्लाइटचे लाइट्स का बंद केले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यामागचे खरं कारण सांगणार आहोत.

(हे ही वाचा : ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त २७ लोकं!  )

टेक ऑफ आणि लँडिंग करण्यापूर्वी लाइट्स का बंद केले जातात?

वास्तविक, आपल्या डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी १० ते ३० मिनिटे लागतात. अशा परिस्थितीत टेक-ऑफ किंवा लँडिंगदरम्यान विमानात अचानक अपघात झाला आणि विमानाचे लाइट्स ताबडतोब बंद झाले, तर अशा परिस्थितीत कोणत्याही प्रवाशाने घाबरून जाऊ नये, याची एअरलाइन्स काळजी घेतात. या कारणामुळे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या खूप आधी विमानाचे लाइट्स मंद होतात. बोईंग एअरलाइन्सच्या मते, २००६ ते २०१७ दरम्यानचे त्यांचे अनुभव असे दर्शवतात की, १३ टक्के अपघात हे टेकऑफच्या पहिल्या तीन मिनिटांत झाले आहेत आणि ४८ टक्के अपघात लँडिंगच्या आठ मिनिटांपूर्वी झाले आहेत.

त्याचप्रमाणे दुसरं कारण म्हणजे, प्रवाशांना फ्लाइटमध्ये लावलेले आपत्कालीन लाइट्स स्पष्टपणे पाहता येतील, यासाठी लँडिंग आणि टेकऑफच्या वेळी विमानाचे लाइट्स बंद केले जातात. आपत्कालीन लाइट्समध्ये चमकणारे रिफ्लेक्टर आहेत आणि हे लाइट्स प्रवाशांच्या आसनांच्या अगदी वर स्थापित केले आहेत, जे लाल आणि पिवळ्या रंगाचे आहेत. हे लाइट्स प्रवाशांना प्रत्येक क्रियेसाठी सिग्नल देण्याचं काम करतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why do the lights go out in an airplane during takeoff and landing pdb
Show comments