मंगळवार, १५ ऑगस्टआपल्या भारत देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन. यंदाही हा दिवस देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा केला जाणार आहे. देशात सर्वत्र याची जय्यत तयारीही सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ७ वाजता दिल्लीतील लाल किल्ल्यावर (Red Fort) ध्वजारोहण करणार आहेत. भारतामध्ये १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस देशात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. 

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडतात. पण १५ ऑगस्टला पंतप्रधान आणि २६ जानेवारीला राष्ट्रपतीच ध्वजारोहण का करतात ? याचा तुम्ही कधी विचार केलाय का…चला तर मग आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया…

Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यात काय फरक आहे?

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण असले तरी ते साजरे करण्याच्या पद्धतीत फरक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशभरात ध्वजारोहण होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा ध्वज खाली दोरीने बांधला जातो आणि दोरी ओढून फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. 

मात्र, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याला वर बांधला जातो. आणि तो पूर्ण फडकवला जातो, याला ध्वज उभारणे म्हणतात. घटनेत त्याचा उल्लेख करून या प्रक्रियेला ध्वज फडकावणे असे म्हटले गेले.

(हे ही वाचा : Independence Day 2023: १५ ऑगस्टला प्रभावी भाषणासाठी तयारी करताय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स; टाळ्यांच्या गजरात होईल कौतुक )

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण का करतात?

स्वातंत्र्यदिनी फक्त देशाचे पंतप्रधानच ध्वजारोहण करतात, खरे तर स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट १९४७ पासून साजरा केला जातो, त्यावेळी देशात संविधान लागू नव्हते. तसेच राष्ट्रपतींनी तोपर्यंत पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळेच प्रथमच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. संविधानाच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, म्हणूनच राष्ट्रपती या दिवशी ध्वजारोहण करतात, कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण होते, येथून पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करतात, तर प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर कार्यक्रम आयोजित केला जातो. येथे भव्य परेड देखील होते.