Why Dose Phone Have Small Hole: सध्याचे युग हे स्मार्टफोनचे आहे. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल फोन वापरला नाही, असा जवळपास कोणीही नाही आणि आज स्मार्टफोन आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत. अन्न, वस्र आणि घर यानंतर आता मोबाईल ही माणसाची चौथी गरज बनण्याच्या मार्गावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बराच वेळ आपण ज्या फोनवर घालवतो त्यातील काही फीचर्स किंवा त्यावर असणाऱ्या विविध टॅब्सचा वापर कशासाठी होतो हे बऱ्याच वेळा माहीत नसते. फोनच्या सर्वात खाली चार्जिंग होलच्या जवळ एक अगदी लहानसा होलही असतो. बऱ्याचदा तो फोनच्या डिझाईनचा एक भाग असेल असे गृहीत धरून, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकांना हा होल नेमका कसला आहे, याबाबत माहिती नसते. त्याचा विचार केला तर ते दिसायला खूप लहान असते परंतु त्याचा उपयोग पाहिला असता तो प्रचंड मोठा आहे. परंतु बऱ्याच लोकांना या होलची स्मार्टफोन वापरात भूमिका काय आहे? हे माहिती नसते. चला तर मग स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला लहान छिद्र का असतो? जाणून घेऊयात…

स्मार्टफोनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला समजत नाहीत, आणि माहितही नाही. त्यापैकीच एक म्हणजे स्मार्टफोनच्या सर्वात खाली चार्जिंग सॉकेट जवळ एक अगदी लहान असे होल असते. परंतु आपल्याला बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल की, त्याचे महत्त्व किती अनन्यसाधारण असे आहे. बहुतांशी हे फोनच्या खालच्या बाजूला चार्जिंग कनेक्शनच्या अगदी शेजारी असते. 

(हे ही वाचा : फोनवर बोलण्यासाठी कोणता कान वापरावा? डावा की उजवा…? वाचा संशोधकांचा सल्ला )

स्मार्टफोनच्या खाली का असते बारीक छिद्र? 

या छिद्राला ‘नॉईज कॅन्सलेशन मायक्रोफोन’ म्हणतात. जेव्हा आपण फोनवर बोलत असतो तेव्हा हे छिद्र आपल्या आजूबाजूला होणारा आवाज रोखण्याचे काम करते. हा लहानसा मायक्रोफोन तुम्ही जर फोनवर बोलताना गोंगाटात असाल तर मागून येणारा संपूर्ण आवाज कॉलवर असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू देत नाही.

बऱ्याच वेळा आपण ट्रॅफिकमध्ये असताना फोनवर बोलत असतो. अशावेळी आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचा आवाज मोठ्याने चालू असतो. परंतु तरीसुद्धा आपल्या आजूबाजूचा आवाज पलीकडच्या आपण ज्या व्यक्तीशी बोलतो त्याला ऐकू न येता फक्त आपलाच आवाज त्याला व्यवस्थित ऐकायला जातो. जेव्हा आपण अशावेळी फोनवर बोलत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला चालू असणारा आवाज थांबवण्याचे महत्त्वाचे काम या होलच्या माध्यमातून केले जाते. अशा पद्धतीने स्मार्टफोनच्या खाली असलेल्या या लहानशा होलचे मोठे कार्य आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why does your android phone have a small hole and what is it for here is the information pdb
First published on: 02-09-2023 at 13:26 IST