अनेकांना श्वान, मांजरासारखे प्राणी आवडतात. श्वान-मांजरासारख्या प्राण्यांना पाळताना त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्या खाण्या-पिण्यापासून त्याच्या शारीरक-मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागते. श्वानांच्या बाबतीत सर्वात गोंधळात टाकणारी आणि विचित्र गोष्ट म्हणजे कोप्रोफॅगिया. जेव्हा श्वान स्वतःची किंवा इतरांची विष्ठा खातात त्यांच्या या वर्तनास कोप्रोफॅगिया असे म्हटले जाते. पाळीव प्राण्यांच्या पालकांना हे गोंधळात टाकणारे वाटू शकते, परंतु या वर्तनामागे तार्किक कारणे आहेत.

याबाबत इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना पुणे पेटकेअर प्रो क्लिनिकचे डॉ. इशान यांच्या मते, “कोप्रोफॅगिया ही केवळ एक विचित्र सवय नाही, ती अनेकदा त्यांच्या शरीरातील अंतर्गत समस्येचे संकेत देते. जसे की आरोग्य समस्या, पौष्टिकतेची कमतरता किंवा तणावप्रेरित वर्तन.

Why are fog smog and vogue different from each other
‘फॉग’, ‘स्मॉग’ आणि ‘व्होग’ हे एकसारखे दिसणारे एकमेकांपासून वेगवेगळे का आहेत? जाणून घ्या…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
On 76 republic day know which are the tallest Flags in India two of them are in Maharashtra
Tallest Flags in India: भारतात ‘या’ ठिकाणी फडकतो सर्वात उंच तिरंगा, महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांचा समावेश
us election polls
US Election Results : ‘अमेरिकेतील लोकशाही धोक्यात’, ७० टक्के मतदारांचे मत; एक्झिट पोलमधून काय कळते?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
Republic Day 2025 How India chooses its chief guest for Republic Day celebrations
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या पद्धत
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

या वर्तनाची कारणे समजून घेऊन या समस्येचे निराकरण करणे हे पहिले पाऊल आहे.

  • वैद्यकीय समस्या(Medical Issues) :

जठरांचे विकार(gastrointestinal disorders), काही पदार्थ शोषणाची लहान आतड्याची असमर्थता(malabsorption issues) किंवा एक्सोक्राइन पॅनक्रियाटिक इन्सफीशियन्सी असलेले श्वान विष्ठा खाऊ शकतात कारण त्यांचे शरीर न पचलेले पोषक तत्वे शोधत असते.

एक्सोक्राइन पॅनक्रियाटिक इन्सफीशियन्सी (EPI) म्हणजे स्वादुपिंड अन्न योग्यरित्या विघटित करण्यासाठी पुरेसे पाचक एंजाइम तयार करत नाही, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे शोषणे कठीण होते.

  • पोषणाची कमतरता (Nutritional Deficiencies):

प्रथिने, फायबर किंवा जीवनसत्त्वे यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव श्वानांना विष्ठेसह पर्यायी स्रोत शोधण्यास भाग पाडू शकतो.

  • सहज वर्तन(Instinctual Behaviour):

जंगलात, मादी श्वान गुहा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि भक्षकांना आकर्षित करू नये म्हणून त्यांच्या पिल्लांची विष्ठा खातात. ही प्रवृत्ती पाळीव श्वानांमध्ये पसरू शकते.

  • चिंता किंवा ताण(Anxiety or Stress):

डॉ. इशान यांनी नमूद केले की, दीर्घकाळ एकटे राहणे किंवा कठोर प्रशिक्षण पद्धतींचा अनुभव घेणे यासारख्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हे सक्तीचे वर्तन होऊ शकते.

  • प्रशिक्षण किंवा देखरेखीचा अभाव(Lack of Training or Supervision):

श्वानांना विष्ठा खाणे टाळण्यासाठी योग्यरित्या प्रशिक्षित केले नसल्यास असे वर्तन करू शकतात.

तुमच्या श्वानाला त्याची विष्ठा खाण्यापासून कसे रोखावे?(How to stop your dog from eating its faeces)

डॉ. इशान कोप्रोफॅगियाचा सामना करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन सुचवतात:

  • तात्काळ स्वच्छता (Immediate Clean-Up) :

श्वानांनी विष्ठा खाऊ नये म्हणून त्यांनी विष्ठा त्वरित साफ करा

  • संतुलित आहार आणि पूरक आहार(Balanced Diet and Supplements):

तुमच्या श्वानाला पौष्टिकदृष्ट्या पूर्ण आहार मिळतो याची खात्री करा. पूरक आहार कोणत्याही उणीवा भरण्यास मदत करू शकतात.

  • व्यायाम आणि मानसिक उत्तेजन (Exercise and Mental Stimulation):

श्वानाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवल्याने कंटाळा आणि ताण कमी होतो.

  • प्रशिक्षण आदेश( Training Commands):

सकारात्मकतने त्यांना छोट्या आज्ञा द्या आणि त्यांचे पालन करण्यास शिकवा. विष्ठा खाणे टाळण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण द्या.

  • प्रतिबंधक (Deterrents) :

श्वानांना विष्ठा खाणे टाळण्यासाठी फॉर-बिड किंवा डिटर सारख्या उत्पादनांचा वापर करा.

  • तज्ज्ञांची मदत (Professional Help):

सतत ही समस्या जाणवत असेल तर पशुवैद्य किंवा श्वानांच्या वर्तनतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

कोप्रोफेजियावर चर्चा करणे लाजिरवाणे वाटत असले तरी, ती अत्यंत सामान्य गोष्ट आहे. त्यावर मात करण्यासाठी संयम, दक्षता आणि कधीकधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. डॉ. इशान सांगतात त्याप्रमाणे, “तुमच्या श्वानाचे वर्तन बहुतेकदा त्यांचा संवाद साधण्याचा मार्ग असतो; त्यांच्या गरजा ऐकणे आणि त्या पूर्ण करणे आपल्यावर अवलंबून आहे.”

Story img Loader