आजकाल अनेकांना झोप न येण्याची समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे याचे प्रमाण वाढत आहे. झोप न लागण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे मानसिक तणाव, हृदयविकार किंवा नैराश्य. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होतात. सात ते आठ तासांची झोप माणसासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याच प्रकारे आवश्यकतेपेक्षा अधिक झोप येणे हे देखील चांगले संकेत नाहीत. पण, तुम्हाला माहितीये का? एक असं गाव आहे, ज्या गावातील लोक सतत झोपत असतात, इतकंच काय तर येथील लोक चालता-चालताही झोपतात. त्यामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
कुठे आहे हे गाव
आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते गाव कझाकिस्तानमध्ये आहे. या गावाचे नाव कलाची आहे. असे म्हणतात की, येथील लोक अनेक महिने झोपतात. यामुळेच या गावाला स्लीपी होलो असेही म्हणतात. या गावाबद्दल असा दावा केला जातो की, येथील प्रत्येक व्यक्ती वर्षातून किमान एक महिना झोपते. आता प्रश्न पडतो की इथल्या लोकांच्या बाबतीत असं का होतं. या गावातील लोकं हे मनापासून करतात की त्यांच्या शरीरात असे काही घडते, ज्यामुळे येथील लोकं इतके दिवस झोपतात.
इथल्या लोकांच्या बाबतीत असं का होतं?
जेव्हा कझाकिस्तानमधील कलाची गावातून अशी आणखी प्रकरणे समोर येऊ लागली, तेव्हा शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन केले आणि इथल्या लोकांमध्ये असे का होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दूषित पाण्यामुळे येथील लोकांमध्ये असे होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. वास्तविक या गावातील पाण्यात कार्बन मोनॉक्साइड मोठ्या प्रमाणात आढळतो, त्यामुळे लोकांची ही अवस्था झाली आहे.
हेही वाचा >> Ladki Bahin Yojana: ‘या’ महिलांना मिळणार ४,५०० रूपये! लाडकी बहीण योजनेतील बदललेला ‘हा’ नियम माहितीये का?
येथील स्थिती इतकी वाईट आहे की, अनेकदा लोक चालता चालता झोपून जातात. प्रत्येक जण कधीही झोपू शकतो, मग ते घर असो, कार्यालय असो किंवा दुकान. इथली परिस्थिती इतकी बिकट आहे की, वाटेने चालत असतानाही कोणीही झोपू शकतो. एखाद्या व्यक्तीला जर झोप आली तर तो रस्त्याच्या कडेलाही झोपतो. इतकंच नाही तर एकदा झोपल्यानंतर काही वेळात ते लगेच जागे होतातच असं नाही. अनेकवेळा असे घडते की, ते बरेच दिवस झोपून राहतात आणि कोणी उठवले नाही तर ते बराच वेळ तिथेच झोपून राहतात. लाची गावात ही घटना २०१० मध्ये पहिल्यांदा घडली होती. या वर्षी गावातील शाळेतील काही मुलांना अचानक झोप लागली आणि ते इतके दिवस झोपले की त्यांना जाग आलीच नाही. यानंतर हळूहळू गावातील १४ टक्के लोकांना कार्बन मोनॉक्साइडचा फटका बसला आणि आता संपूर्ण गावच त्याच्या विळख्यात आहे. त्यामुळे हे लोक गाव सोडून जाऊ लागले आहेत. मात्र, गरीब वर्गातील लोक आजही या गावात राहत असून या समस्येशी ते झगडत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd