इंग्रजी वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होते आणि याच वर्षाच्या सुरुवातीला पहिला भारतीय सण येतो तो म्हणजे मकरसंक्रांती. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण सुरू होतो. दानधर्म करणं आणि सूर्याला जलअर्ध्य अर्पण करणं याबरोबर तिळगूळ देऊन एकमेकांना गोड बोलण्याच्या शुभेच्छा देणं यासाठी हा सण ओळखला जातो.

नव्या वर्षाचं कॅलेंडर उघडलं की यंदाची संक्रांत कोणत्या दिवशी येते हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. कारण १४ जानेवारी म्हणजे संक्रांत हा अनेकांचा समज काही वर्षी चुकीचा ठरतो. काही वर्षांमध्ये संक्रांत ही १५ जानेवारीला येते.

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे इंग्रजी दिनदर्शिकेत बरेच बदल होतात, पण मकरसंक्रांतीच्या तारखेत फारसा बदल होत नाही, ही गोष्ट तशी बुचकळ्यात टाकणारी आहे. आज त्याच गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात की मकरसंक्राती ही १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते?

आणखी वाचा : आमंत्रण की, निमंत्रण? अर्थामध्ये नेमका फरक काय?

हा इंग्रजी वर्षातील सर्वात पहिला सण आहे आणि या सणापासून आपल्याकडे वेगवेगळ्या मंगलकार्यांचा शुभारंभ होतो. वेगवेगळ्या राज्यात या सणाचं महत्त्व आणि नाव वेगवेगळं आहे. लोहडी, खिचडी, उत्तरायण, पोंगल अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण विविध राज्यात साजरा केला जातो.

मकरसंक्रांतीची सुरुवात सूर्याच्या राशीपरिवर्तनाने होते. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकच असतो, ती तारीख म्हणजे १४ जानेवारी. पण दर ८ वर्षांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश करायचा दिवस एका दिवसाने पुढे जात असल्याने काही वर्षात मकरसंक्रांती १५ तारखेला असते.

आणखी वाचा : लॉकच्या तळाशी का असते एक लहान छिद्र? कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल

यामुळेच संक्रांत ही कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येते. यंदाची मकरसंक्रांती ही १५ जानेवारीला आहे. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एक असा काळ येईल तेव्हापासून संक्रांत ही कायम १५ जानेवारीलाच येईल. त्यांच्या अभ्यासानुसार साधारणपणे २०५० पासून मकरसंक्रांती १५ जानेवारीलाच येऊ शकते अशी शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे.

Story img Loader