Why Moon called Chanda Mama: आपण सर्वांनी लहानपणी चंद्राला मामा म्हणून हाक मारली असावी. आम्ही लहान असताना यावर एक कविताही खूप गाजली होती. “चंदा मामा दूर के…” ही कविता प्रत्येक मुलाच्या ओठावर होती. आजही गावात मुलांना हेच शिकवले जाते. वर्षानुवर्षे प्रत्येक आईच्या अंगाई गीतात देखील चंद्राला आई ‘चंदा मामा’च म्हणते, पण चंद्राला मामा का म्हणतात, काका, बाबा, भाऊ का म्हणत नाहीत, याचा विचार करण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? मग ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. भारत हा एकमेव देश आहे जिथे चंद्राला मामाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक हिंदी कवींनी त्यांच्या कवितांमध्ये चंद्राला मामा असे संबोधले आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया ‘चंद्राला मामा’च का म्हणतात …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…म्हणून चंद्राला मामा म्हणतात

वास्तविक, चंद्राला मामा म्हणण्याचे रहस्य पौराणिक कथेशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, ज्यावेळी देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन चालू होते तेव्हा समुद्रातून अनेक घटक बाहेर आले, ज्यात देवी लक्ष्मी, वारुणी, चंद्र आणि विष यांचा समावेश होता. बाहेर येणार्‍या सर्व घटकांना माँ लक्ष्मीचे धाकटे भाऊ किंवा बहीण म्हणत. त्यापैकी एक चंद्र होता. आपण लक्ष्मीला आपली आई मानत असल्याने तिचा धाकटा भाऊ आपला मामा झाला. म्हणूनच चंदाला मामा म्हणतात. ते सर्व समुद्रमंथनातून बाहेर आलेले असल्याने सागराला या सर्वांचा पिता म्हणतात. 

(हे ही वाचा : नायक चित्रपटाप्रमाणे फक्त एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेले शहर माहितेय? नाव वाचून व्हाल चकित )

आता हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, आपण देवी लक्ष्मीला माता म्हणतो, म्हणून तिचा भाऊ चंद्रमा आमचा मामा झाला. आता त्यामागील वैज्ञानिक पैलूही समजून घ्या. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, भावाप्रमाणे तो पृथ्वीचे रक्षण करतो आणि आपण पृथ्वीला आपली माता मानतो, म्हणून चंद्र आपला मामा आहे. या आधारावरच चंद्र यांना मामाचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय देशात चंद्राला मामा म्हणणाऱ्या इतरही अनेक श्रद्धा आहेत.

(वरिल माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why moon called chanda mama its all because of mythological stories find out here pdb
First published on: 13-08-2023 at 16:30 IST