Why Don’t Trains Provide Seat-Belts?: कारमध्ये सीटबेल्ट हा सक्तीचा आहे, पण त्याहीपेक्षा तो सुरक्षिततेसाठी आहे. गाडीतील प्रवाशांसाठी २ पॉइंट, ३ पॉइंट सीटबेल्ट दिलेले आहेत, पण लाखो, करोडो लोक दररोज रेल्वेमध्ये प्रवास करतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचा सरासरी वेग साधारणपणे गाडीपेक्षा जास्त असतो. तरीही रेल्वेमध्ये सीटबेल्ट का दिले जात नाहीत? रेल्वेमध्ये सीटबेल्ट का लावले जात नाहीत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
सीटबेल्ट हा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असून तो गाड्यांमध्येही बंधनकारक करण्यात आला आहे. आजकाल कारमध्ये तसेच विमानात, अगदी महागड्या ट्रकमध्ये सीटबेल्ट दिले जातात पण ट्रेनमध्ये सीटबेल्ट का दिले जात नाहीत हा एक विचित्र पण वैध प्रश्न आहे. वंदे भारतसारख्या देशातील आधुनिक गाड्यांमध्येही सीटबेल्ट कुठेच दिसत नाहीत. सीट बेल्ट लावला नाही तर ट्रेनचा प्रवास सुरक्षित आहे असे समजू नका. वाहतुकीच्या इतर साधनांप्रमाणेच रेल्वे प्रवासातही धोका असतो.
भारतात दररोज रेल्वे अपघात होत आहेत. काही दिवसापूर्वीच वंदे भारत ट्रेन ट्रॅकवर एका गायीला धडकली. भारतात दररोज ट्रेन रुळावरून उतरतात किंवा टक्कर होण्याचा धोका असतो. रेल्वे अपघातामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. रेल्वे अपघाताची परिस्थिती फक्त भारतातच आहे, असे नाही, ही समस्या जगभर पसरलेली आहे, मात्र ट्रेनमध्ये सीटबेल्टची सुविधा कोणत्याही देशात उपलब्ध नाही. आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या कारणांसाठी रेल्वेने प्रवास करतात.
(हे ही वाचा : प्रवाशांनो! रेल्वेचे डब्बे लाल, निळा अन् हिरव्या रंगांचेच का असतात तुम्हाला माहितीय का? खास कारण जाणून थक्क व्हाल )
रेल्वेमध्ये सीटबेल्ट का दिले जात नाही?
याचे एक प्रमुख कारण म्हणजे, लांबच्या प्रवासात रेल्वेमध्ये चालण्याची संधी असते आणि अशा परिस्थितीत सीट बेल्ट हा मोठा अडथळा ठरू शकतो. त्याचवेळी, काही रेल्वेमध्ये झोपण्याची सुविधा देखील असते आणि अशा परिस्थितीत सीटबेल्ट एक मोठी समस्या बनू शकते. रेल्वे प्रवास या स्वातंत्र्यासाठी ओळखला जातो. दुसरीकडे, लांबच्या प्रवासात सीटबेल्ट बंधनकारक केल्यास सीटवरून उठून कुठेतरी चालण्याचे स्वातंत्र्य निघून जाईल, जे त्रासाचे कारण बनू शकते. त्यामुळे रेल्वेमध्ये सीट बेल्ट लावले जात नाहीत.
रेल्वे कितीही वेगाने धावत असली तरी त्यात फिरणे खूप सोपे आहे. जरी अनेक देशांनी रेल्वेमध्ये सीटबेल्ट देण्याचा प्रयत्न केला, परंतु १०० पैकी फक्त २६ लोक सीटबेल्ट वापरत होते. रेल्वेच्या प्रवासात अनेक लोक सीटबेल्ट वापरत नाहीत. रेल्वेमध्ये सीटबेल्टऐवजी चांगली सीट बसवावी जेणेकरून रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करता येईल, असे अनेक अभ्यासातूनही देखील बाहेर आले आहेत जे चांगले आसन रेल्वेमध्ये बसविण्याची पुष्टी करतात.