Why There is An Empty Space in the Middle of Blade: आपल्या आजूबाजूला अशा अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. ज्यांच्यामागील कारण आपल्याला जाणून घ्यायचे असते. कधी कधी या गोष्टी इतक्या वेगळ्या असतात की यामागील कारण कोणालाचं माहीत नसते. आज आपण अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल कदाचित काही लोकांनाच माहिती असेल. ब्लेड सर्वांनीच पाहिले आहे. प्रत्येकाच्या घरात ब्लेडचा वापर केला जातो. या ब्लेडच्या मध्यभागी एक मोकळी जागा असते. ही जागा नेमकी कशासाठी असते हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..
तुम्ही पाहिले असेल की, ब्लेड कोणत्याही कंपनीचे असले तरी त्याची रचना सारखीच असते. ब्लेड कुठेही बनवला गेला तरीही यामध्ये असलेली मोकळी जागा ही प्रत्येक ब्लेडमध्ये एकसारखी असते. ब्लेडच्या मध्यभागी असलेल्या या मोकळ्या जागेचे नेमके काम काय आहे? खरं तर यामागचे एक रंजक कारण आहे. जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
१९०१ मध्ये किंग कॅम्प जिलेट यांनी विल्यम निकर्सनच्या मदतीने ब्लेड बनवला. जिल्हा कंपनीने ब्लेडचे पेटंटही घेतले आणि त्यानंतर १९०४ पासून त्याचे उत्पादन सुरू केले. ब्लेडची रचना त्यांनीच केली होती. त्या काळात ब्लेडचा वापर फक्त शेव्हिंगसाठी केला जात असे, यावेळी ब्लेडच्या मध्यभागी असलेली रिकामी जागा अशाप्रकारे बनवली गेली होती की ब्लेड रेझरच्या बोल्टमध्ये व्यवस्थित बसेल. त्यावेळी बाजारात जिलेटशिवाय दुसरी कोणतीही कंपनी नव्हती, त्यामुळे ही रचना त्यांनीच केली होती.
( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावे ऐकून तुम्हालाही हसू येईल; मुंबईतील ‘या’ स्टेशनाचाही आहे सहभाग)
जेव्हा ब्लेड व्यवसाय फायदेशीर बनला, तेव्हा इतर अनेक कंपन्यांनी देखील या क्षेत्रात प्रवेश केला. त्या काळात फक्त जिलेट शेव्हिंग रेझर्स बनवत असे, त्यामुळे कंपनी कोणतीही असो, रेझरनुसार ब्लेडची रचना सारखीच ठेवावी लागली. सध्या, दररोज दहा लाखांहून अधिक ब्लेड तयार केले जातात आणि रेझरचे देखील युज अँड थ्रो डिझाइन्स देखील येऊ लागल्या आहेत, परंतु तेव्हापासून ब्लेडच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.