घोड्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते. अनेक चित्रपटांमध्ये घोड्यांवर बसलेला हिरो आपण पाहिलेला असेल. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे घोड्यांवरूनच सवारी करायचे. फोटोमध्ये किंवा प्रत्यक्षात आपण घोड्यांना उभे असलेले पाहिले असेल. कधी क्वचितच आपल्याला खाली बसलेला घोडा बघायला मिळतो. अनेकदा आपण त्यांना झोपलेलेपण बघत नाही. मग खरंच घोडे झोपत नाहीत का? किंवा ते खाली बसतच नाहीत का? असे अनेक प्रश्न मनात येतात. चला तर मग जाणून घेऊया घोडे खरंच झोपतात का? किंवा ते उभेच का असतात?

हेही वाचा- ‘या’ देशातील लोक पितात दिवसाला ३० कप कॉफी; भारतात याचे प्रमाण किती?

The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ganesh Naik talk about human and wildlife conflict and Solution plan
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यंत आले तर काय…”
Animals have exceptional memory
विलक्षण स्मरणशक्ती असते ‘या’ प्राण्यांकडे! माणसालाही देऊ शकतात आव्हान
elephant and her baby viral video
अरेरे! पिल्लाला झोपेतून उठवणारी आई; कधी सोंड, तर कधी शेपटी ओढत प्रयत्न सुरू; Viral Video पाहून आवरणार नाही हसू
Do butterflies sleep at night
माणसांप्रमाणे फुलपाखरंही रात्री झोपतात का? जाणून घ्या रंजक माहिती…
Benefits of wearing socks at night
Sleeping With Socks : रात्री मोजे घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे; पण ‘या’ चुकांमुळे होतील अनेक आरोग्य समस्या
women responsibility, free Time women , women ,
रिकामटेकडी

घोडे खाली बसतात का?

घोडे बरेचदा उभे राहिलेले दिसतात. त्यामुळे ते कधी आराम करायला खाली बसतात का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण सत्य हे आहे की घोडे नेहमी उभे राहत नाहीत, तर कधी कधी खाली बसतातही. खरं तर घोड्यांची शारीरिक रचना अशी आहे की, ते न बसता उभे राहून आराम करू शकतात. त्यामुळे त्यांना जास्त बसण्याची गरज नसते. याशिवाय, त्यांच्या शारीरिक रचनेमुळे, घोड्याला आराम करण्यासाठी खाली बसताना अधिक अस्वस्थ वाटते. म्हणूनच तो आपला बहुतेक वेळ उभा राहून घालवतो.

हेही वाचा- झाडं का कोमेजतात? काय आहे यामागचे कारण, घ्या जाणून

घोडे कसे झोपतात?

घोडे बराच वेळ उभे राहिले तर झोपत नाहीत का? असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. पण, घोडे झोपत नाहीत असे नाही. फरक एवढाच आहे की, ते उभे असताना झोपतात किंवा विश्रांती घेतात. त्यामुळे घोडे झोपले आहेत की जागे आहेत याचा अंदाज घेता येत नाही. घोडे दिवसातून अनेकदा ३० मिनिटांपर्यंत गाढ झोप घेतात. याचबरोबर ते दिवसभर छोटी-छोटी डुलकी घेत असतात.

हेही वाचा- कासवांचं आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त कसं असतं? जगातील सगळ्यात म्हातारे कासव कोणते? घ्या जाणून

घोडे उभेच का राहतात यामागेही महत्त्वाचं कारण आहे. घोड्यांच्या शारीरिक रचनेमुळे त्यांना बसण्यापेक्षा उभे राहणे अधिक आरामदायक असते. घोड्यांची पाठ सरळ असते, जी वाकू शकत नाही. जेव्हा घोडा बसतो, तेव्हा त्याला उठण्यास त्रास होतो. खाली बसल्याने घोड्याच्या शरीराचा संपूर्ण भार त्याच्या शरीराच्या पुढील भागावर येतो, अशा स्थितीत त्याला श्वास घेण्यासही त्रास होतो, त्यामुळे ते अगदी कमी वेळा खाली बसण्याचा प्रयत्न करतात. तसेच घोडे उभे असतानाही विश्रांती घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना खाली बसण्याची गरज नसते.

Story img Loader