Poison Expiry Date: बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या-त्या वस्तूची एक्सपायरी डेट तपासून घेत असतो. वस्तूच्या कव्हरवर किंवा पॅकिंग केलेल्या बॉक्सवर एक्सपायरी डेट पाहायला मिळते. एक्सपायरी डेट निघून गेलेल्या वस्तूच्या वापरामुळे हानी होऊ शकते. औषधेही ठराविक काळानंतर खराब होतात. त्यामुळे त्यांनाही एक्सपायरी डेट असते. अशा औषधांचे सेवन करणे धोकादायक असते. एक्सपायरी डेट निघून गेलेली औषधे ही विषाप्रमाणे असतात असे म्हटले जाते.
औषधे खराब झाल्यावर विष बनतात, तर विषाची एक्सपायरी डेट निघून गेल्यावर ते अधिक खतरनाक बनते की त्याचा प्रभाव कमी होतो? मुळात विषाची एक्सपायरी डेट असते का? विष म्हणजेच Poison संबंधित अनेक प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरे आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.
विषाला Expiry Date असते का?
एबीपी लाइव्हने दिलेल्या माहितीनुसार, औषधांप्रमाणे विष तयार करण्याचीही विशिष्ट पद्धत असते. वेगवेगळी रसायन एकत्र केल्याने विष तयार केले जाते. औषधांसारखी विषामध्येही विविधता असते. एका ठराविक पद्धतीचे विष तयार करण्यासाठीचे रासायनिक समीकरण असते. विष तयार करताना वापरल्या गेलेल्या रसायनांवरुन त्याची Expiry Date ठरत असते. एखाद्या रसायनाचा प्रभाव काही काळानंतर कमी झाल्याने विषाच्या प्रभावामध्येही फरक पडू शकतो.
आणखी वाचा – Delivery करण्यासाठी वापरले जाणारे बॉक्स हे नेहमी तपकिरी रंगाचे का असतात? जाणून घ्या..
विष Expire झाल्यावर त्याचा प्रभाव कमी होतो की वाढतो?
एबीपी लाइव्हने दिलेल्या माहितीनुसार, एक्सपायरी डेट निघून गेल्यावर विषाचा प्रभाव कमी होईल की वाढेल, हे विष बनवताना वापरलेल्या गोष्टींवर अवंलबून असते. विषामधील एखादा घटक ठराविक काळानंतर Expire झाल्यास विषाचा प्रभाव काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. असे असले तरीही ते विष हानिकारक असते आणि त्याच्यामुळे लोकांचा जीव जाऊ शकतो. विष तयार करताना वापरलेले काही घटक खराब झाल्याने रासायनिक प्रक्रिया सुरु होऊ शकते. यामुळे विषाची दाहकता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे विष Expire झाल्यावर काय होईल हे त्या-त्या विषाच्या प्रकारावरुन ठरत असते असे म्हटले जाते.