father property son right : अनेक जण आपल्या आयुष्यात अनेक मालमत्ता किंवा संपत्ती कमावतात. अशा मालमत्ता जंगम आणि स्थावर अशा दोन्ही प्रकारच्या असतात. एखाद्या व्यक्तीकडे रिअल इस्टेटमध्ये प्लॅट, बँक खाते, एफडी, शेअर्स, वाहने, डिबेंचर, रोख रक्कम, सोने चांदी इत्यादी संपत्तीच्या स्वरूपात अनेक जंगम गोष्टी असतात. स्थावरमध्ये व्यक्तीचे घर, प्लॉट, फ्लॅट, शेतजमीन इत्यादी सर्व मालमत्ताचा समावेश होतो. मुख्यतः संपत्तीचे तीन प्रकार असतात.
१ स्वत: अधिग्रहित केलेली मालमत्ता : अशी मालमत्ता व्यक्ती स्वत: कमावते. आता ही मालमत्ता स्वतःच्या कमावलेल्या पैशातून विकत घेतलेली असते किंवा त्या व्यक्तीला अशी मालमत्ता व्यवसायातून मिळालेली असते किंवा अशी मालमत्ता त्या व्यक्तीला भेट स्वरूपात कोणी तरी दिलेली असते. या सगळ्या मालमत्तेला स्व-अधिग्रहित मालमत्ता म्हणतात.
२ वारसात मिळालेली मालमत्ता किंवा इच्छापत्रात मिळालेली मालमत्ता : ही एक प्रकारे एखाद्या व्यक्तीची स्व-अधिग्रहित मालमत्ता आहे. कारण वारसा माणसाला नैसर्गिकरित्या प्राप्त होतो आणि मृत्युपत्रातही मृत्यूपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीच्या नातेसंबंधांमुळे मालमत्ता मिळते.
३ वडिलोपार्जित मालमत्ता : ही मालमत्ता तीन पिढ्यांनंतरची मालमत्ता आहे. तीन पिढ्यांपूर्वीची मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता बनते. आजकाल अशा मालमत्ता कमी आहेत, पण जुन्या संयुक्त कुटुंबांकडे अजूनही अशा मालमत्ता उपलब्ध आहेत. वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क सामान्यपणे आहे, असे समजले जाते. कोणत्याही जिवंत वडिलांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मालमत्तेवर मुलांचा अधिकारी आहे हे गृहितक चुकीचे आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे स्वतःच्या वडिलांकडून, आईकडून किंवा इतर नातेवाईकांकडून वारशाने मिळालेल्या मालमत्तेसह स्व-अधिग्रहित मालमत्ता असेल आणि मृत्युपत्राद्वारे मिळालेली मालमत्ता असेल, तर ती व्यक्ती हयात असेपर्यंत त्या मालमत्तेवर मुलांचा कोणताही अधिकार नसतो. जरी तो वडिलांच्या मालमत्तेचा वापर करत असला किंवा तिथे राहत असला तरी त्याला हक्क सांगण्याचा अधिकार नाही. खरं तर वडिलांनी मुलांना मालमत्तेच्या वापरापासून रोखले नाही हा त्यांचा मोठेपणा आहे अन्यथा वडिलांना आपल्या मुलांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करण्याचा अधिकार आहे.
मुले कोणत्याही परिस्थितीत वडिलांच्या किंवा आईच्या कोणत्याही मालमत्तेत हस्तक्षेप करू शकत नाहीत किंवा त्या मालमत्तेवर दावा करू शकत नाहीत. आजोबांच्या मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला (वडिलांना) अशी संपत्ती वारसाहक्काने मिळाली असली तरी ती मालमत्ता त्यांच्या आजोबांची आहे, या आधारावर त्या व्यक्ती(वडिलांची)ची मुले त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाहीत, कारण मालमत्तेवर पहिला हक्क हा त्या व्यक्ती (आजोबांच्या)च्या हयात असलेल्या मुला(वडिलांचा)चा असतो. मुलगी आणि पत्नीची नसतो. नात किंवा नातू ही मालमत्ता त्यांच्या आजोबांची आहे, वडील हयात असताना आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा हक्क नाही, या आधारावर मालमत्तेवर हक्क सांगता येत नाही. पतीच्या हयातीत सुनेलाही असा अधिकार नसतो.
हेही वाचाः अरविंद केजरीवालांच्या बंगल्याच्या सजावटीसाठी ४५ कोटींचा खर्च, नुसते पडदे आठ लाखांचे, तर मार्बल…
वडिलोपार्जित संपत्ती : वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलांचा आणि पत्नीचा निश्चितच हक्क असतो. कारण ही मालमत्ता गेल्या तीन पिढ्यांपासून आलेली आहे. अशी मालमत्ता एखाद्या व्यक्तीची अधिग्रहित मालमत्ता मानली जात नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे अशी मालमत्ता असेल तर त्याची मुले अशा मालमत्तेवर हक्क सांगू शकतात आणि वडीलही आपल्या मुलांना अशा मालमत्तेतून बाहेर काढू शकत नाहीत.
हेही वाचाः ‘या’ सरकारी बँकेने व्याजदरात केली वाढ, ५५५ दिवसांच्या एफडीवर मिळतोय मोठा नफा