Online Payment: ऑनलाईन पेमेंट (Online Payment) आणि यूपीआय पेमेंटमुळे (UPI Payment) बँकिंग सुविधा सुलभ झाल्या आहेत. मात्र, यामुळे लोकांना कधीकधी समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा पैसे पाठवताना झालेल्या चुकीमुळे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (Money transfer) होऊ शकतात. परंतु आता एकदा दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण असे चुकून ट्रान्सफर झालेले पैसे तुम्ही परत मिळवू शकता. पैसे परत कसे मिळविता येईल, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चुकीच्या खात्यावर पैसे पाठवले? काळजी करू नका
तुम्ही चुकून चुकीच्या खात्यात पैसे पाठवले असतील तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडच्या काळात बँकिंग (Banking) सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी विशेषत: ऑनलाइन बँकिंगसाठी आणि आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक आवश्यक पावले उचलली आहेत, जे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

( आणखी वाचा: आता YouTubeच्या ‘या’ भन्नाट फीचरवरुन महिन्याला कमवा लाखो रुपये; आताच जाणून घ्या कसा होईल तुमचा फायदा?)

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम

  • पैसे चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्यास सर्वात प्रथम तुमच्या बँकेच्या ब्रँचला भेट द्या. तुम्हाला ७ ते १५ दिवसांच्या आत याबाबत तक्रार देणे आवश्यक आहे. चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास संबंधित बॅंक अधिकाऱ्याशी लवकरात लवकर संपर्क साधा. जर संबंधित व्यक्तीने तुम्ही ट्रान्सफर केलेले पैसे खर्च केले असतील तर नियमांनुसार बॅंक तुमचे पैसे तुम्हाला परत देईल, आणि पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीचा बॅलन्स निगेटिव्ह केला जाईल.
  • गुगल पे, पेटीएम, फोन पे यांसारख्या अ‍ॅप्समधून UPI पेमेंट चुकीच्या खात्यात गेले किंवा हस्तांतरित झाले तर या संबंधित कंपन्या याला जबाबदार नाही. यासाठी तुम्हाला थेट बॅंकेशी संपर्क साधावा लागेल, याकरता तुमचे UPI पेमेंट बॅंकेशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील तर तुम्हाला थेट बॅंकेच्या Customer Care ला यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. तसेच बहुतेक बॅंकांमध्ये थेट मेलची सुविधा सुद्धा ग्राहकांना देण्यात आलेली आहे. संबंधित बॅंकेत मेल केल्याने तुमच्या तक्रारीचे निवारण होऊ शकते. परंतु मेलद्वारे प्रकरण न सुटल्यास संबंधित बॅंकेच्या शाखेत जावे लागेल.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont worry if money transferred to wrong account while making online payment get back know rbi rules pdb