भारतीय चित्रपटातील प्रणयदृश्यं अर्थात भडक रोमँटिक सीन्स आणि सेक्स सीन्सकडे आजही एका वेगळ्याच नजरेतून पाहिलं जातं. ‘सेक्स’ या गोष्टीकडे आजही आपला समाज एक टॅबू म्हणूनच बघतो. यासाठी काही प्रमाणात आपले चित्रपटदेखील कारणीभूत आहेत. पाश्चिमात्य देशांप्रमाणे कधीच आपल्या चित्रपटात उघडपणे सेक्स सीन दाखवले गेले नाहीत, किंवा कधीच त्याबद्दल उघडपणे चर्चा झाली नाही. यामुळे लोकांमधील याबद्दलचे कुतूहल आणखीन वाढत गेले आणि हळूहळू ती एक जणू वाईट गोष्ट आहे असं आपल्या मनावर नकळतपणे बिंबवण्यात आलं. अर्थात सध्याच्या वेबसीरिज आणि चित्रपटात जे बीभत्स प्रकार आपल्याला सर्रास पाहायला मिळतात त्यांचं समर्थनही अयोग्यच आहे, पण एकूणच भारतीय चित्रपटात या बोल्ड रोमँटिक सीन्स आणि सेक्स सीन्सचा वापर कधी सुरू झाला आणि त्यात काळानुरूप झालेले बदल हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : Video : नेहा शर्माचा पिवळ्या लेहेंग्यातील बोल्ड लूक व्हायरल; नेटकरी म्हणाले, “ही दुसरी उर्फी जावेद…”

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

भारतीय चित्रपटातील प्रथम नग्न दृश्यं :

बीडी गर्गा यांचं ‘सो मेनी सिनेमाज- द मोशन पिक्चर इन इंडिया’ या पुस्तकानुसार १९२१ च्या ‘सती अनुसूया’ या चित्रपटात प्रथम एका स्त्रीला पूर्णपणे विवस्त्र दाखवण्यात आल्याचं म्हंटलं जातं. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक जय प्रकाश चौकसे यांनी मात्र ही गोष्ट खोडून काढली होती. बीबीसीशी संवाद साधताना ते म्हणाले, “याबाबतीत मला फारशी माहिती नाही, पण हे झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा ब्रिटिशांनी १९१८ मध्ये भारतात सेन्सॉरशीप कायदा लागू केला तेव्हा फक्त देशभक्तीचा प्रचार करणाऱ्या चित्रपटांवरच बंदी घातली जायची. नग्नता, चुंबनदृश्यं यासाठी त्या कायद्यात काहीच तरतूद नव्हती.”

त्यानंतर १९३३ मध्ये आलेल्या ‘कर्मा’ या चित्रपटात देविका रानी आणि हिमांशु रॉय यांच्यात प्रथमच एक मोठा किसिंग सीन चित्रित करण्यात आला. यानंतरच सरकारकडून सेन्सॉरशीप आल्याचं म्हंटलं जातं. हळूहळू चित्रपटातही अशी बोल्ड दृश्यं दिसू लागली. त्या बोल्ड सीन्सचा चित्रपटांना होणारा फायदा निर्माते आणि दिग्दर्शक यांना जाणवू लागला. ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘राम तेरी गंगा मैली’ अशा कित्येक चित्रपटात मग या बोल्ड सीन्सचा भडिमार होऊ लागला.

सेक्स सीन ते सॉफ्ट पॉर्न प्रवास :

जसजशी सेन्सॉरशीपमधून सूट मिळत होती तसतसं एकूणच चित्रपटातील या सेक्स सीन्सचं बीभत्स चित्र डोळ्यासमोर येऊ लागलं. ८० आणि ९० च्या दशकात केवळ बोल्ड सेक्स सीन्ससाठीच चित्रपट करण्यात येत होते असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही. याच काळात या बी आणि सी ग्रेड चित्रपटांचा सुळसुळाट झाला, चित्रपट पाहणारा प्रेक्षकही बदलला होता, त्या काळातले चित्रपट पाहणारे हे मजूर वर्गातील लोक, रिक्षावाले, रोजच्या वेतनावर काम करणारे लोक होते त्यामुळे अशा प्रेक्षकांना समोर ठेवून असेच बोल्ड चित्रपट केले जात होते. या चित्रपटात सेक्स सीन्सबरोबर बलात्काराचे सीन्सही पाहायला मिळत असे आणि प्रेक्षक ते चवीने बघतही असत.

याच काळात कांती शाहसारख्या दिग्दर्शकाने ‘गुंडा’ चित्रपट करून लोकांना आणखी उत्तेजित करायचा प्रयत्न केला. मिथुन चक्रवर्ती, मुकेश ऋषिपासून थेट धर्मेंद्रसारख्या बड्याबड्या कलाकारांनीही अशा चित्रपटात कामं करायला सुरुवात केली. १९९८ मध्ये आलेला ‘गुंडा’ हा बी आणि सी ग्रेड चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड होता. कालांतराने मात्र या चित्रपटातून कथा हरवली आणि उरले ते फक्त सेक्स सीन्स, यामुळेच पुढे असे चित्रपट यायचे बंद झाले.

यानंतर चित्रपटातील या सेक्स सीन्सनी एक वेगळं वळण घेतलं. स्त्रीला ऑब्जेक्टिफाय करणं, वेगवेगळ्या आयटम नंबर्समधून प्रेक्षकांच्या भावना चाळवणं आणि पद्धतीशीररित्या सेक्स सीन मोठ्या पडद्यावार दाखवायला सुरुवात झाली. हे एक प्रकारचे उच्च वर्गातील लोकांचे बी ग्रेड चित्रपटच होते. महेश भट्ट, मुकेश भट्ट, अनुराग बसूसारखे मोठमोठे निर्माते आणि दिग्दर्शक हे चित्रपट सादर करू लागले. बडेबडे कलाकार स्वतः अशा चित्रपटात सेक्स सीन्स करायला राजी झाले.

१९९६ मध्ये आलेल्या आमिर खानच्या ‘राजा हिंदुस्तानी’ मधील सर्वात मोठ्या किसिंग सीनने धुमाकूळ घातला. त्यानंतर दीपा मेहताच्या ‘फायर’मधून दोन महिलांमधील शारीरिक आकर्षण आणि प्रेमसंबंध यावर भाष्य करण्यात आलं. शबाना आझमी आणि नंदिता दास या दोघींनी अत्यंत बोल्ड सीन्स यासाठी दिले. १९९७ साली रेखा. ओम पुरी यांच्या ‘आस्था’ या चित्रपटाने तर सगळ्या सीमा ओलांडल्या. यानंतर ‘मर्डर’, ‘जीस्म’, ‘कसूर’सारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये भरभरून सेक्स सीन दाखवले जाऊ लागले. नंतर ‘अनफ़्रीडम’, ‘पार्च्ड’, ‘अलिगढ’, ‘लिप्स्टिक अंडर माय बुर्का’ ‘शुभमंगल ज्यादा सावधान’सारख्या चित्रपटातून होमो सेक्शुअलिटी आणि इतर प्रकारच्या लैंगिक प्रेफरन्सबद्दल भाष्य करण्यात आलं.

ओटीटीने आणखी भर घातली :

२०१६ मध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओने भारतीय बाजारात एन्ट्री घेतली आणि तिथून मनोरंजनविश्वातील या भडक दृश्यांना एक वेगळंच वळण मिळालं. ओटीटी माध्यमांवर कसलीच बंधनं नसल्याने उघडपणे नग्नता, अश्लील दृश्यं, हिंसा, रक्तपात, दाखवणं सुरू झालं. पहिली भारतीय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सीझन बहुदा याचसाठी लोकांनी बघितला असावा. यानंतर आलेल्या असंख्य वेबसीरिजमध्ये या गोष्टी अगदी सर्रास पाहायला मिळू लागल्या. ज्या गोष्टी पूर्णपणे दाखवायची गरज नसते त्यासगळ्या गोष्टी अगदी राजरोसपणे ओटीटीवर दाखवल्या जाऊ लागल्या.

‘मिर्झापुर’, ‘पाताल लोक’सारख्या वेबसीरिजमध्ये दाखवलेली लैंगिक हिंसा आणि अंगावर येणारा रक्तपात या फार सर्रास झाल्या. लोकप्रिय निर्माता दिग्दर्शक करण जोहरलाही हा मोह आवरता आला नाही. एंथोलॉजी फिल्म ‘लस्ट स्टोरीज’मध्ये त्याने ‘सेल्फ फीमेल प्लेजर’सारखा गंभीर मुद्दा हाताळला खरा पण त्या सीनमध्ये कियारा आडवाणीकडे लोकांनी भलत्याच नजरेतून पाहिलं. याबरोबरच कोणताही अंकुश नसल्याने अशा वेबसीरिजमधून गे लेसबीयन सीन्स तर आणखी रंगवून दाखवले जाऊ लागले. नेटफ्लिक्सवर नुकत्याच आलेल्या ‘क्लास’ या वेबसीरिजमधून तर या गोष्टी फार खालच्या थराला जाऊन दाखवल्या गेल्या.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर दिवसाला यापैकी काहीतरी एक नवीन आपल्याला बघायला मिळत असतं. कसलंही बंधन नसल्याने कल्पकतेच्या नावाखाली पाश्चिमात्य देशांना अंधपणे फॉलो करण्यातच सध्याचे भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म व्यस्त आहेत. चांगल्या वेबसीरिजदेखील आपल्याला पाहायला मिळत आहेत पण या बोल्ड कंटेंटच्या तुलनेत त्यांची संख्या फारच कमी आहे. शिवाय ‘अल्ट बालाजी’, ‘उल्लू’सारख्या अगणित ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सॉफ्ट पॉर्न हे अगदी राजरोसपणे विकलं जात आहे. ओटीटीमुळे नक्कीच या सगळ्या गोष्टींवर उघडपणे भाष्य करायची, या गोष्टी प्रेक्षकांपुढे सादर करायची उत्तम संधी मिळाली आहे फक्त त्या स्वातंत्र्याचा वापर नीट होत नसल्याने खासकरून भारतीय ओटीटी विश्वात ही समस्या बघायला मिळत आहे. २१ व्या शतकात ‘सेक्स’कडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन थोडा का होईना बदलला असला तरी त्यावर सध्या काही प्रमाणात लगाम घालायची मागणी होतानाही दिसत आहे.

Story img Loader