DRDO and ISRO : डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ (DRDO) ही आपल्या देशाच्या संरक्षणाच्या सिद्धतेसाठी विविध प्रकारचे संशोधन कार्य करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. डीआरडीओ ही संस्था भारतीय सशस्त्र दलासाठी महत्वाची मानली जाते. डीआरडीओ विविध प्रकारचे संशोधन आणि क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत असते. तसेच अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जगात आपला ठसा उमटवण्याचं काम इस्रो (Indian Space Research Organization) करते. या दोन्ही संस्था देशासाठी महत्वाचं आणि व्यापक संशोधन करत असतात. मात्र, अनेकांना डीआरडीओ (DRDO) आणि इस्रो (ISRO) मधील फरक माहिती नसतो किंवा अनेकांना या संस्थाबद्दल फारसी माहिती नसते. त्यामुळे आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रोची स्थापना कधी झाली?

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला इस्रो (ISRO) असंही म्हटलं जातं. या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली. अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी करणाऱ्या संस्थामध्ये अग्रगण्य संस्थापैकी असलेली इस्रो ही एक संस्था आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करण्यासह विविध संसोधन करण्याचं काम ही संस्था करते. इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे.

हेही वाचा : Minimum Balance बँक खात्यात न ठेवल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते? जाणून घ्या

इस्रोचं महत्व काय आहे?

भारताला अंतराळात प्रवेश देण्यासाठी प्रक्षेपण आणि संबंधित तंत्रज्ञानाची रचना आणि विकास करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. इस्रो पृथ्वी निरीक्षण, नेव्हिगेशन, हवामानशास्त्र आणि अवकाश विज्ञान यासाठी उपग्रह आणि संबंधित तंत्रज्ञानाची रचना आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम करते. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (INSAT) कार्यक्रम इस्रोद्वारे दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि विकासात्मक अनुप्रयोगांची गरज पूर्ण करण्यासाठी विकसित केला गेला.

इस्रोचा इतिहास काय?

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना १९६९ मध्ये करण्यात आली होती. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखलं जातं. त्यांनी इस्रोची स्थापना केली आणि भारताच्या अंतराळ संशोधनाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९८० च्या दशकात आर्यभट्ट नावाचे पहिले भारतीय अंतराळयान विकसित केले गेले होते. आर्यभट्टच्या प्रक्षेपणानंतर भारताने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर अंतराळातील जगातील आघाडीच्या राष्ट्रांपैकी एक बनले.

डीआरडीओ काय आहे?

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ होय. डीआरडीओ ही अशी संस्था आहे जी भारतासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार स्थापित करण्यासाठी कार्य करते. तसेच ते सशस्त्र दलांना आवश्यकतेनुसार अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत असते.

डीआरडीओ ची स्थापना कधी झाली?

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ (DRDO) ची स्थापना १९५८ मध्ये झाली. त्यावेळी भारतीय लष्कराच्या तांत्रिक विकास आस्थापना (TDE) आणि तांत्रिक विकास आणि उत्पादन संचालनालय (DTDP) संरक्षण विज्ञान संघटना (DSO) मध्ये विलीन करण्यात आले. दरम्यान, ५००० हून अधिक शास्त्रज्ञ आणि विविध कर्मचारी संस्थेसोबत काम करत आहेत.

डीआरडीओचं महत्त्व काय?

डीआरडीओने अग्नी आणि पृथ्वी मालिकेतील क्षेपणास्त्रे, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, तेजसी, मल्टी बॅरल रॉकेट लाँचर, पिनाका एअर डिफेन्स सिस्टीम, आकाशो रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीची मोठी तुकडी यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मची निर्मिती डीआरडीओ करत असतं. तसेच आत्मनिर्भरता आणि यशस्वी स्वदेशी विकास हे डीआरडीओचं ध्येय आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याला चालना देण्यासाठी डीआरडीओची भूमिका महत्वाची असते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drdo and isro news what is the difference between drdo and isro in marathi gkt