India Overtake China in Population: काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार भारताच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. भारताने लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरातील तज्ज्ञांनी याबाबत अंदाज वर्तवला होता आणि आता संयुक्त राष्ट्राच्या जनसंख्येच्या (UNFPA) आकड्यांनुसार भारत लोकसंख्येत अव्वल स्थानी असल्याचे सिद्ध झाले आहे. (UNFPA) नुसार भारतात आता चीनच्या तुलनेत २० लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. पण अनेकांना हा प्रश्न पडलाय की, भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ नंतर कोविडमुळे २०२१ मध्ये जनगणना झालीच नव्हती, मग भारताची लोकसंख्या वाढल्याचा दावा नेमका कशाच्या आधारावर करण्यात आला? आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्था युनाइटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या गणनेनुसार देशाच्या लोकसंख्येचे अंदाज वर्तवले जातात. मुख्यतः यासाठी तीन घटक विचारात घेतले जातात. ते म्हणजे, जन्म दर, मृत्यू दर व मायग्रेशन म्हणजेच स्थलांतरितांचा दर, यावरून देशाच्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवता येऊ शकतो. जनगणनेशिवाय लोकसंख्या मोजण्यासाठी डेमोग्राफी विज्ञान वापरले जाते, UNFPA ने या वेळेस याच तंत्रज्ञानाच्या आधारे लोकसंख्येचा अहवाल दिलेला आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व संगणकशास्त्र यातील विविध नियमांना फॉलो केले जाते.

हे ही वाचा<< ..तर डीमार्ट, Zudio सारखे ब्रँड कॅरीबॅगसाठी तुमच्याकडे पैसे मागू शकत नाहीत! ग्राहकांनो, ‘असं’ लावा डोकं

एखाद्या देशात ठरावीक काळातील जन्म, मृत्यू, स्थलांतरित लोकसंख्या ही सरकारी व खासगी प्रणालींच्या माध्यमांमधूनसुद्धा जाणून घेता येते. जसे की त्या काळात देशभरातील हॉस्पिटल्समध्ये किती जन्म व मृत्यूचे प्रमाण नोंदवले गेले . याशिवाय टेलिकॉम कंपनीद्वारेही देशातील नेटवर्क वापरकर्त्या जनसंख्येचे आकडे जाणून त्यानुसार अंदाज वर्तवले जाऊ शकतात.

२०२१ च्या जनगणनेसाठी काय नियोजन आहे, हे केंद्र सरकारने अद्यापि जाहीर केलेले नाही. याबाबत संसदेत विचारल्यानंतर आम्हाला वेळेवरच जनगणना करायची आहे. मात्र अचानकपणे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलावी लागली, असे उत्तर केंद्र सरकारने दिले होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During covid 19 how 142 crores indian population calculated without census crossing china in number of citizens svs