या क्षणी तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया माध्यमावर गेलात तर तिथे तुम्हाला ‘मोये मोये’ या सर्बियन गाण्यावरील व्हिडीओ पाहायला मिळतील. हा ट्रेंड सगळ्यात पहिले, टिकटॉकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला. यामध्ये बऱ्याच टिकटॉकर्सनी डझनम गाण्यातील ‘मोये मोये’ हा एक भाग घेऊन त्यावर त्यांना आवडतील तसे व्हिडीओ बनवून शेअर केले. नंतर या गाण्याची क्रेझ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्युब यांसारख्या सर्व सोशल माध्यमांवर वेड्यासारखी पसरली असल्याचे आपण पाहू शकतो.

खरंतर या बहुचर्चित अशा या डझनम गाण्यात ‘मोये मोये’ हा शब्द नसून, ‘मोये मोरे’ असा शब्द वापरला आहे. ‘मोये मोरे’ हा शब्द गाण्यात सतत येत असल्याने, बऱ्याच लोकांचे या शब्दाने लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणे जरी वेगळ्या भाषेचे असले तरीही, आज जगभरात केवळ याच गाण्याचा ट्रेंड आहे.

Snehal Tarde
“मी फार प्रेमात…”, लग्नात प्रवीण तरडेंकडे स्नेहल तरडेंनी मागितलेली ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Bollywood Actress Shilpa Shetty Dance On Taambdi Chaamdi song
Video: शिल्पा शेट्टीला ‘तांबडी चामडी’ गाण्याची पडली भुरळ, अभिनेत्रीने केला हटके डान्स; नेटकरी म्हणाले, “ही वेडी झालीये काय?”
Actor Sankarshan Karhade presented a beautiful poem for his mother watch video
Video: “जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा”, संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकून कलाकार झाले भावुक, पाहा व्हिडीओ
Jahnavi Killekar Suraj Chavan video
“आम्ही नॉमिनेट झाल्यावर…”, जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणच्या कुटुंबाला सांगितले त्याचे किस्से; पाहा व्हिडीओ
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण
Paaru
Video : पारू अन् आदित्यचा मराठमोळा अंदाज! दोघांचं प्रेम खुलणार, मालिकेचं नवीन गाणं पाहिलंत का?
Lakhat Ek aamcha dada
Video:माझी होशील का? सूर्याने प्रपोज करताच तुळजा…; पाहा ‘लाखात एक आमचा दादा’मालिकेचा नवीन प्रोमो

‘डझनम’ असे या गाण्याचे मूळ नाव असून, हे गाणे दोन मिनिटे आणि चोपन्न सेकंदांचे आहे. टेया डोरा [Teya Dora] या सर्बियन गीतकार आणि गायिकेने हे गाणे गायले असून, गाण्याच्या व्हिडीओमधील तिने काम केले आहे. तिने सर्बियन रॅपर स्लोबोदान वेल्कोविक कोबीसोबत [Slobodan Velkovic Coby] मिळून या गाण्याचे शब्द लिहिले असून, लोका जोव्हानोविक [Loka Jovanovic] याने या गाण्याला संगीत दिले आहे.

आत्तापर्यन्त डझनम गाण्याला युट्युबवर तब्बल ५७० लाख इतके व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे, टेया डोराने सोशल मीडियावरून सर्वांचे भरपूर आभार मानले आहेत. त्याचसोबत आता जगभरात सर्बियन गाणी ऐकली जात आहेत याबद्दल कौतुकदेखील केले आहे.

हेही वाचा : Video : काय! ‘चीज’ घालून बनवले संत्र्याचे सरबत; ‘या’ Viral व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहा. . .

परंतु डझनम गाण्यामधील ‘मोये मोरे’ याचा नेमका अर्थ तरी काय?
असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर मोये मोरे मधील ‘मोरे’ या शब्दाचा अर्थ सर्बियन भाषेत ‘दुःस्वप्न किंवा एखादा वाईट अनुभव’ असा होतो. हा शब्द डझनम गाण्यात, त्याच्या दडलेल्या अर्थावर प्रकाश टाकण्याचे काम करतो.
या गाण्याचा अर्थ काय आहे हे थोडक्यात समजून घ्या. अपूर्ण राहिलेली स्वप्ने, अपूर्ण इच्छा-आकांक्षा यांच्यासमोर हार न मानता; या सर्व वाईट अनुभवांमध्ये खचून न जाता सकारात्मकतेने आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करत राहावे असे काहीसे या गाण्यातून सांगण्यात आले आहे. सतत येणाऱ्या वाईट अनुभव, नैराश्य, एकटेपणा यासर्वांवर मात करून कुणीतरी आपले प्रेमाने सांत्वन करेल, आपल्याला समजून घेण्याचा प्रयन्त करील अशी आशा तुम्ही करता. असे काहीसे या गाण्यातून सांगितले आहे.

हे गाणं वेगळ्या भाषेतील असूनही जगभरात याला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. यावरूनच, संगीत या विषयाला भाषेचे बंधन नसते हे दिसून येते.
आपण जगाच्या कोणत्याही भागातील असलो, तरीही संगीत सगळ्यांना बांधून ठेवण्याचे काम करत असते.