आधार कार्ड आज प्रत्येक कामासाठी आवश्यक झाले आहे. एखादे बँक खाते उघडायचे असो, शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असो, घर खरेदी करायचे असो किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, आधार कार्डची आवश्यकता सर्वत्र आहे. आधार कार्ड हे ओळखीच्या पुराव्यासाठी तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी देशात सर्वत्र स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांपैकी एक आहे. परंतु, व्यक्तींची गोपनीयता राखण्यासाठी आणि कुठेही प्रवास करताना सुलभतेसाठी, आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आवश्यक असेल तेथे ई-आधार वापरण्याची परवानगी दिली आहे. ई-आधार म्हणजे काय? सामान्य आधार कार्ड प्रमाणेच हे वैध आहे का? ई-आधार कार्ड मिळवण्याची प्रक्रिया काय? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ई-आधार म्हणजे काय? ते आधारच्या भौतिक प्रतीइतकेच वैध आहे का?

ई-आधार ही आधारची पासवर्ड संरक्षित इलेक्ट्रॉनिक प्रत आहे, ज्यावर UIDAI च्या सक्षम प्राधिकरणाने डिजिटल स्वाक्षरी केली आहे. त्याच्या वेबसाइटवरील ई-आधारवर UIDAI FAQ नुसार, “आधार कायद्यानुसार, ई-आधार सर्व उद्देशांसाठी आधारच्या भौतिक प्रतीप्रमाणेच वैध आहे.” २८ एप्रिल २०१७ रोजी जारी करण्यात आलेल्या UIDAI च्या परिपत्रकानुसार, “डाउनलोड केलेल्या आधार (ई-आधार) धारकाचे नाव, पत्ता, लिंग, फोटो आणि जन्मतारीख तपशील छापलेल्या आधार पत्राप्रमाणेच आहे.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये ब्रँडेड कार नव्हे तर पिकअप ट्रक चर्चेत; राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत वाढली मागणी, कारण काय?

डाउनलोड केलेल्या आधारमध्ये आधार निर्मितीची तारीख आणि डाउनलोड केलेल्या आधारची तारीखदेखील समाविष्ट आहे. हा आयटी कायदा, २००० नुसार UIDAI द्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेला दस्तऐवज आहे, जो डिजिटल स्वाक्षरींसह इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर मान्यता प्रदान करतो, त्यामुळे कायद्याच्या कलम चार अंतर्गत ई-आधार हा ओळखीचा वैध पुरावा आहे. आधार (नोंदणी आणि अद्यतन) विनियम, २०१६ मध्ये आधारपत्राची मुद्रित आवृत्ती म्हणून हे स्पष्ट केले आहे की, डाउनलोड केलेले आधार (ई-आधार) हे एक वैध आणि सुरक्षित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आहे, ज्याला मुद्रित आधारपत्राच्या बरोबरीने मानले पाहिजे. पुरावा म्हणून मुद्रित आधार स्वीकारणारी मंत्रालये/विभाग/राज्य सरकारे/यंत्रणा ओळखीचा पुरावा म्हणून डाउनलोड केलेले आधार (ई-आधार) देखील स्वीकारणे आवश्यक आहे.

ई-आधार कसा डाउनलोड करायचा?

आधार कार्डधारक दोन मार्गांनी ई-आधार डाउनलोड करू शकतात.

डाउनलोड केलेल्या आधारमध्ये आधार निर्मितीची तारीख आणि डाउनलोड केलेल्या आधारची तारीखदेखील समाविष्ट आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

नावनोंदणी क्रमांक वापरून

आधार कार्डधारक पूर्ण नाव आणि पिन कोडसह २८ अंकी नोंदणी क्रमांक वापरून ई-आधार डाउनलोड करू शकतात. या डाउनलोड प्रक्रियेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होतो. ओटीपीऐवजी ई-आधार डाउनलोड करण्यासाठी टीओटीपी वापरू शकतात. mAadhaar मोबाइल ॲप्लिकेशन वापरून टीओटीपी जनरेट होऊ शकतो.

आधार क्रमांक वापरून

आधार कार्डधारक पूर्ण नाव आणि पिन कोडसह १२ अंकी आधार क्रमांक वापरून ई-आधार डाउनलोड करू शकतात. या डाउनलोड प्रक्रियेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होतो. ओटीपी ऐवजी ई-आधार डाउनलोड करण्यासाठी टीओटीपी वापरू शकतात. mAadhaar मोबाइल ॲप्लिकेशन वापरून टीओटीपी जनरेट होऊ शकतो.

ई-आधारचा पासवर्ड कसा असतो?

कॅपिटलमधील नावाची पहिली चार अक्षरे आणि पासवर्ड म्हणून जन्माचे वर्ष (YYYY) यांचे संयोजन असणारा ई-आधारचा पासवर्ड असतो.

उदाहरणार्थ:

उदाहरण १
नाव : राजेश कुमार
जन्म वर्ष : १९८०
पासवर्ड : RAJE1980

उदाहरण २
नाव : राज कुमार
जन्म वर्ष : १९८०
पासवर्ड : RAJK1980

तुम्ही ई-आधार कुठून डाउनलोड करू शकता?

तुम्ही UIDAI वेबसाइट्स – https://uidai.gov.in/ किंवा https://eaadhaar.uidai.gov.in ला भेट देऊन ई-आधार डाउनलोड करू शकता.

ई-आधारमध्ये डिजिटल स्वाक्षरी कशी प्रमाणित करावी?

  • डिजिटल स्वाक्षरी सत्यापित करताना संगणक इंटरनेटशी कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे.
  • ‘व्हॅलिडीटी अननोन’ आयकॉनवर राईट क्लिक करा आणि ‘व्हॅलिडेट सिग्नेचर’ वर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर स्वाक्षरी प्रमाणीकरण असणारी एक विंडो येईल. त्यातील ‘सिग्नेचर प्रॉपरटीझ’वर क्लिक करा.
  • ‘शो सर्टिफिकेट’वर क्लिक करा.

हेही वाचा : ब्रिटनच्या महिला मंत्र्यांचे बांगलादेशमधील भ्रष्टाचार प्रकरणात नाव; या प्रकरणाचा शेख हसीना यांच्याशी काय संबंध?

  • आता ‘NIC 2011 for NIC sub-CA, National Informatics centre’ वर क्लिक करा.
  • पुढे, ‘ट्रस्ट’ टॅबवर क्लिक करा आणि नंतर ‘ॲड टू ट्रस्टेड आयडेंटिटी’वर क्लिक करा.
  • खालील कोणत्याही सुरक्षा प्रश्नाला ‘ओके’ उत्तर द्या.
  • प्रमाणीकरण कार्यान्वित करण्यासाठी ‘व्हॅलिडेट सिग्नेचर’वर क्लिक करा आणि सिग्नेचर व्हॅलिडेट करा.