What To Do During And After An Earthquake? दिल्ली-NCR मध्ये आज सकाळी ५:३६ वाजता भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.० ऐवढी मोजली गेली असून, याचे केंद्र 5 किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपाच्या झटक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत भूकंपाच्या वेळी सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.भूकंप ही अचानक येणारी आपत्ती आहे त्यामुळे तो कधी आणि कुठे येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ऐनवेळी अशा धोकादायक घटनेपासून बचाव करण्यासाठी ठोस अशी उपाययोजना नाही. परंतु असे भूकंप आल्यावर स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही सूचनाचं पालन आणि खबरदारी घेतल्यास आपण भूकंपासून स्वतःचे संरक्षण करु शकतो. तर यासाठी काय करावं लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भूकंपाच्या वेळी आणि नंतर काय करावे ?

  • तुम्ही घरामध्ये असल्यास, इमारतीच्या मध्यभागी असलेल्या भिंतीसमोर उभे राहा, दारात उभे राहा. डेस्क किंवा टेबलासारख्या जड फर्निचरखाली जा.
  • जर तुम्ही घराबाहेर असाल, तर विजेच्या तारा किंवा पडू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब जा आणि मोकळ्या जागेत रहा.
  • इमारतींपासून दूर राहा कारण इमारतीवरून सामान पडू शकते.
  • लिफ्टचा वापर करू नका कारण ते बंद होऊ शकतात.
  • मेणबत्त्या किंवा कोणतीही ज्वलंत वस्तू वापरू नका.

गाडीत असाल तेव्हा काय करावे?

  • शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवा.
  • तुम्ही कारमध्ये असल्यास, कार थांबवा आणि भूकंप थांबेपर्यंत कारमध्येच रहा.
  • पुलाखाली किंवा उंच इमारतीजवळ थांबू नका.
  • भूकंपाचे झटके बंद झाल्यावर रस्त्याची स्थिती तपासून मगच पुढे निघा.
  • क्षतिग्रस्त किंवा तुटलेल्या पुल, ब्रीज किंवा रस्त्याचा वापर करू नका.
  • हे मार्ग अचानक कोसळून पडू शकतात.

भूकंपानंतर काय करावे?

  • विजेचे उपकरण वापरणे टाळा.
  • गॅस गळतीची शक्यता असल्यामुळे लाइटर पेटवू नका.
  • शक्यतो, फोनच्या फ्लॅशलाइटचा वापर करून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
  • शुद्ध पाणी नसेल, तर ओलसर कपड्याने ओठ ओले करा.
  • भूकंपाच्या वेळी घाईगडबड करू नका आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वरील उपायांचा अवलंब करा.

Story img Loader